चौदा वर्षांच्या आदिवासी मुलीवर चाळीशीतल्या नराधमाचा बलात्कार
चौदा वर्षांच्या अल्पवयीन आदिवासी मुलीवर चाळीशीतल्या नराधमाचा बलात्कार
पिडीत मुलगी गरीदार राहिल्याने घटना उघडकीस
शेलपिंपळगाव येथील प्रकार
चाकण:
चौदा वर्षांच्या अल्पवयीन आदिवासी ठाकर समाजातील मुलीवर चाळीस वर्षाच्या नराधमाने जीवे ठार मारण्याची धमकी देत दोनदा पाशवी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे घडला. ही अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आह्व. पीडीत मुलीच्या फिर्यादीवरून बाबाजी दादाभाऊ कुलूस (वय 40,रा.शेलपिंपळगाव ता. खेड) यास पोलिसांनी अटक करून आज(दि.10)न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी कुलूस यास दहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या बाबतचे वृत्त असे की,पिडीत अल्पवयीन मुलीचे वडील व नराधम बाबाजी कुलूस हे मित्र होते.मासेमारीच्या व्यवसायाच्या निमित्ताने कुलूस याचे त्यांच्या घरी येणे-जाणे होते. मागील वर्षी (2012) दिवाळी सणाच्या दरम्यान घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत कुलूस याने पिडीत अल्पवयीन मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी देत त्याच्यावर पाशवी बलात्कार केला. ही घटना संबंधित मुलीने आपल्या आईला सांगितली.मात्र या घटनेत आपल्याच आब्रूची लक्तरे वेशीला टांगली जातील असे नातेवाईकांनी सांगितल्याने पिडीत मुलीने याचा बोभाटा केला नाही.एकदा झालेल्या या घटनेनंतर काहीही झाले नाही त्यामुळे सोकावलेल्या कुलूसने दुसऱ्यांदा घरात कोणी नसताना या मुलीवर बलात्कार केला.त्यानंतर तिसऱ्यांदा त्याने घरात कोणीही नसल्याचे पाहून या मुलीवर 2013 मध्ये जानेवारी महिन्यात मकरसंक्रांतींच्या सणाच्या दिवशी बळजबरीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असता या अल्पवयीन मुलीने स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्याचा हाताला जोरदार चावा घेतला व स्वतःचा बचाव केला. आपण गरीब आदिवासी ठाकर समाजातील असल्याने संबंधित नराधमाला तक्रारी करूनही काहीही फरक पडणार नाही या समजातून नातेवाईकांनी पिडीत मुलीला गप्प राहण्यास सांगून हे सर्व प्रकार निमुटपणे सहन केले. मात्र या दरम्यान पिडीत अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने या घटनेवर प्रकाश पडला. पिडीत मुलीवर सध्या पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरु असून तीच्या फिर्यादी नुसार नराधम बाबाजी कुलूस याच्यावर बलात्कार,दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रोसिटी अॅक्ट)गुन्हा दाखल केला आहे. आज(दि.10) पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दहा दिवस (दि.18 एप्रिल पर्यंत)पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.या बाबत अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भारत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशील कदम,पोलीस उपनिरीक्षक कुमार कदम व त्यांचे सहकरी करीत आहेत.
---------------
--------------- अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा