चाकणला व्यापाऱ्यांचा पुन्हा कडकडीत बंद
चाकण:
एलबीटी लागू करण्याबाबत सरकार ठाम असल्याने आणि व्यापार्यांच्या आंदोलनाबाबत सरकार दाखवत असलेल्या अनास्थेमुळे व्यापारी संघटनांनी आज (दि. 22) पासून पुकारलेल्या दोन दिवसांच्या बंदला चाकण भागातील व्यापाऱ्यांनी पाठींबा देत कडकडीत बंद पाळून व शहरातून मूक मोर्चा काढून हा पाठींबा व्यक्त केला . उद्या (मंगळवार) पासून मात्र चाकण मधील सर्व व्यवहार सुरुळीत ठेवण्यात येणार असल्याचे विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले.
चाकण मध्ये गेल्या चार दिवसांपासून रिक्षामधून ध्वनिक्षेपकावरून या बंदचे आवाहन करण्यात येत होते . चाकण मधील किराणा,बिल्डींग मटेरियल, हॉटेल, आदी सर्वच व्यापारी संघटना या बंद मध्ये सहभागी झाल्या होत्या . महानगर पालिका क्षेत्रात एलबीटी यशस्वी झाल्यानंतर ग्रामीण भागात ,ग्रामपंचायत क्षेत्रात एलबीटी लागू होणार असल्याचे व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी संदिप परदेशी , अशोक सांकला, ईश्वर कर्नावट ,आदींनी यावेळी सांगितले. व्यापाऱ्यांना व नागरिकांना "बंद'मध्ये सहभागी होण्याचे आवाहन चार दिवसांपासून करण्यात आले होते .चाकण मधील किराणा -भूसारा व्यापारी संघटना ,चाकण बिल्डींग मटेरीअल संघटना,हॉटेल व्यावसायिकांची संघटना ते फ्लेक्स -होर्डिंग व्यावसायिकांची संघटना व अन्य सर्वच व्यावसायिकांच्या संघटनांनी या बंद मध्ये सहभाग घेतल्याने चाकण मधील व्यवहार ठप्प झाले होते.गेल्या पंधरा-वीस दिवसांमध्ये दुसरा कडकडीत बंद अनुभवावा लागल्याने नागरिकांनी मात्र नाराजी व्यक्त केली.ग्रामीण भागाशी एलबीटी चा काहीही संबंध नसताना वारंवारच्या बंद मुळे सामान्य नागरिकांचीच कोंडी होत असल्याची चाकणकरांची तक्रार आहे.औषधालयांच्या संघटनेने या बंदला पाठींबा दिला मात्र औषधालये सुरूच ठेवली होती.मात्र बहुतांश सर्वच व्यवहार बंद राहिल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले.
--------------
अविनाश दुधवडे, चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा