महाराष्ट्र कामगार सभेच्या नामफलकाचे चाकणला अनावरण


महाराष्ट्र कामगार सभेच्या नामफलकाचे चाकणला अनावरण
विविध मागण्यांसाठी देणार संघटीत लढा

चाकण:
  ग्रामविकासाचा पाया असलेले व शासनाच्या ध्येयधोरणांची अंमलबजावणी करणारे राज्य भरातील  अनेक ग्रामपंचायत कर्मचारी अजूनही वेतन श्रेणी व निवृत्तिवेतनाच्या प्रतीक्षेत आहेत  त्यांना न्याय  मिळावा म्हणून सर्वांनी संघटीत पणे लढा देण्याची गरज आहे,असे प्रतिपादन महाराष्ट्र कामगार सभेचे संस्थापक अध्यक्ष ऍड.नाना क्षीरसागर यांनी आज (दि.4)चाकण येथे केले.
  चाकण ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी  महाराष्ट्र कामगार सभेचे सदस्यत्व स्विकारून या संघटनेच्या नामफलकाचे अनावरण चाकण ग्रामपंचायत कार्यालयासमोर केले.त्या प्रंसगी ऍड.क्षीरसागर मार्गदर्शन करताना बोलत होते.यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे माजी उपाध्यक्ष किरण मांजरे,जिल्हा परिषद सदस्य सुरेश गोरे,
जनहित संघर्ष फौंडेशनचे उमेश आगरकर,भाजपा महिला आघाडीच्या संगीता नाईकरे ,दिशा पवार,कामगार संघटनेच्या चाकण अध्यक्षा शांता धोत्रे ,उपाध्यक्षा विजयमाला साळवे, खजिनदार फकीरा धनवटे, सचिव संगीता घोगरे,आदींसह सर्व कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.
  शासनाच्या विविध योजना गावपातळीवर राबविणारे ग्रामपंचायत कर्मचारी स्वातंत्र्य काळापासून अगदीच तुटपुंज्या मानधनावर काम करीत असल्यामुळे कर्मचारी गेल्या 40 वर्षांपासून वेतनश्रेणीच्या प्रतीक्षेत आहेत.शासनाने ग्रामपंचायत कर्मचारी वेतनश्रेणीचा धोरणात्मक निर्णय घ्यावा,अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा,ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा चतुर्थ श्रेणीत समावेश करावा,पेंशन योजना लागू करावी,सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळावी, पगार वेळेवर द्यावा अशा मागण्याही यावेळी ऍड.क्षीरसागर यांनी केल्या . यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेश गोरे,किरण मांजरे,यांनीही विचार व्यक्त केले.
------------अविनाश दुधवडे, चाकण ९९२२४५७४७५ 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)