पोलिसांच्या निष्पक्षपाती भूमिकेबाबत त्यांच्या वागणुकीने सर्वांनाच शंका
कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे पोलिसांपुढे आव्हान *राज्याच्या काही भागात स्थिती गंभीर * पोलिसांच्या निष्पक्षपाती भूमिकेबाबत शंका --------- एखादी कामगिरी फत्ते केली की पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडावा, अशी परिस्थिती सद्य कुठेही राहिली नाही . कारण एखादा तपास लावला ,टोळी पोलिसांनी जेरबंद केली तरी त्या नंतर नव्या घटना समोर येतात .सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी सुरू आहे. बदलती राजकीय स्थिती आणि मतदारसंघाचीही बदलती भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, या वेळची निवडणूकही वेगळी ठरणार आहे. त्यामुळे या काळात आणि नंतरही कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. निर्भय वातावरणात पोलिसांनी निवडणुका पार पाडण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा असताना काही भागात मात्र धक्कादायक स्थिती पहावयास मिळत आहे. निवडणुकांदरम्यान पोलिसांच्या निष्पक्षपाती भूमिके विषयी नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरु असल्याने ,काही ठराविक राजकीय सलगी ठेवणाऱ्या पोलिसांना आपल्या भावनांना मुरड घालीत निःपक्षपाती भूमिका घ्यावी लागणार आहे. कोणत्याही राजकीय पक्षाकडून किंवा कार्यकर्त्याकडून आपला वापर केला जाणार...