कडकडीत उन्हाळ्यात बंधारे तुडुंब
कडकडीत उन्हाळ्यात बंधारे तुडुंब
चाकण:
दुष्काळात होरपळणार्या सोलापूरकरांना मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार खेड तालुक्यातील भामा-आसखेड आणि मावळातील आंद्रा धरणांमधून उजनी धरणात पाणी सोडण्यात येत असून ,दुष्काळात होरळपणार्या सोलापूरच्या जनतेला पाणी मिळावे यासाठी भामा आसखेड धरणातून नदीपात्रात 1 हजार क्यूसेक्स वेगाने पाणी विसर्ग सुरु असून या पाण्यामुळे नदीवरील सर्व बंधारे कडकडीत उन्हाळ्यात तुडुंब भरले आहेत.
ऐन उन्हाळ्यात नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे खेड बरोबरच शिरुर व दौंड तालुक्यासह या नदीकडेच्या सर्व गावांना फायदा होत आहे.आसखेड धरणातून भामा नदीच्या पात्रात वेगवान पाणी विर्सग सुरु आहे.एरवी उन्हाळात कोरडा दिसणारा चाकण च्या पाणी पुरवठ्याचा वाकी बंधारा या वर्षी मात्र तुडुंब भरलेला पहावयास मिळत आहे. त्याच प्रमाणे ठीकठिकाणचे नदीपात्रातील बंधारे पाण्यामुळे भरले आहे.या पाण्याचा उन्हाळी बाजरी, ऊस व तरकारी पिकांना फायदा करून घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे . नदीकडेच्या विहिरीतील पाणी पातळी वाढण्यासही यामुळे मदत झाली असून जनावरांसाठी चारा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. या नदी काठच्या लगतच्या शिरूर ,दौंड आदी सर्वच ठिकाणच्या गावांना या पाण्यामुळे दिलासा मिळला आहे.भामा-आसखेड धरणाचे पाणी उजनीसाठी सोडल्यानंतर नदीकाठच्या शेतकर्यांच्या उपसा जलसिंचन वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.मात्र उजनीला पाणी देताना आमच्या पिकांची आहुती कशाला? अशा शेतकर्यांमध्ये जोरदार असंतोषामुळे जलसिंचन योजनांच्या विद्युत पंपाचा वीज पुरवठा वीज वितरणने या भागात पूर्ववत केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
-------
फोटो : उजनीला सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे चाकणला पाणी पुरवठा होणारा वाकी बंधारा कडकडीत उन्हाळ्यात असा तुडुंब आहे.............................अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा