महापालिका हद्दीतील व्यापाऱ्यांच्या बंदचे लोण चाकण मध्ये


महापालिका हद्दीतील व्यापाऱ्यांच्या बंदचे लोण चाकण मध्ये
चाकण मध्ये कडकडीत बंद
बंदच्या आंदोलनास चाकण मधील व्यापाऱ्यांचे बळ

चाकण: 
कातीऐवजी राज्यातील अ, ब आणि क वर्गातील महापालिकांना आज(दि.1)पासून प्रस्तावित स्थानिक संस्था कर (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) लावण्याची घोषणा राज्य शासनाने केल्या नंतर शहरांतील व्यापाऱ्यांनी बंद चे हत्यार उपसले आहे .चाकण सारख्या भागात याचा तसा थेट काही परिणाम नसतानाही चाकण मधील सर्व व्यवहार सोमवारी काही संघटनांच्या 'दमदार' आवाहनामुळे बंद ठेवण्यात आले.यामुळे सामान्य नागरिकांचे हाल झाले.स्थानिक संस्था कर(एलबीटी) या नव्या कराच्या बाबतीत चाकण सारख्या भागातील व्यापा-यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 चाकण मध्ये रिक्षांवर ध्वनिक्षेपक लावून व्यापाऱ्यांना व नागरिकांना "बंद'मध्ये सहभागी होण्याचे आवाहन दोन दिवसांपासून करण्यात आले होते .चाकण मधील किराणा -भूसारा व्यापारी संघटना ,चाकण बिल्डींग मटेरीअल संघटना,हॉटेल व्यावसायिकांची संघटना ते फ्लेक्स -होर्डिंग व्यावसायिकांची संघटना व अन्य सर्वच व्यावसायिकांच्या संघटनांनी या बंद मध्ये सहभाग घेतल्याने चाकण मधील व्यवहार ठप्प झाले होते.औषधालयांच्या संघटनेने या बंदला पाठींबा दिला मात्र औषधालये सुरूच ठेवली होती.मात्र बहुतांश सर्वच व्यवहार बंद राहिल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले.
 या करामुळे महापालिका हद्दीतील शहरांप्रमाणेच ग्रामपंचायती सारख्या स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असणाऱ्या व्यापा-यांची कोंडी होणार असल्याची भीती अनेक व्यवसायिकांच्या मनात निर्माण झाली आहे. मुक्त व्यापाराच्या काळात अशा प्रकारची प्रणाली अयोग्य असल्याच्या भावनेतून पुण्यामधील व्यापारी या कराला विरोध करत आहेत, त्यांना पाठींबा देण्यासाठी  या भागातील व्यापाऱ्यांनीही बंद मध्ये सहभाग घेतल्याचे येथील व्यापाऱ्यांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यानी सांगितले.स्थानिक संस्था कर(एलबीटी) या नव्या कराच्या बाबतीत चाकण सारख्या भागातील विविध व्यवसायातील व्यापा-यांमध्येही संभ्रमाचे वातावरण पसरले आहे, व याचा भविष्यात अप्रत्यक्ष परिणाम आपल्याही व्यवसायावर होणार असल्याची भावना निर्माण झाली आहे .त्यामुळेच पुण्यातील व्यापार्‍यांनी एलबीटी (स्थानिक संस्था कर) विरोधात सुरू केलेल्या आंदोलनास चाकण सारख्या औद्योगिक दृष्ट्या महत्वाच्या  शहरातील व्यापाऱ्यांनीही बळ दिले आहे.त्यामुळे आता शासनाला हे नवे कर लावताना शहरी भागातील व्यापाऱ्यांना याचे महत्व समजावून सांगून एकीकडे योग्य ती माहिती व्यापा-यांपर्यंत पोहोचविताना दुसरीकडे ग्रामीण भागातील व्यापार्‍यांना विश्‍वासात घेणेही गरजेचे झाले आहे.
 दरम्यान ग्रामीण भागात याचा थेट परिणाम नसताना बंद ठेवण्यात आलेल्या व्यवहारांमुळे नागरिकाची होणारी परवड लक्षात घेवून किमान मंगळवार (दि.2) पासून सर्व व्यवहार सुरुळीत करावेत अशी मागणी चाकण भागातील नागरिकांनी केली आहे.
-------
                                                        अविनाश दुधवडे,चाकण , 9922457475

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)