नेहमी गजबजलेल्या मोशी जकात नाक्यावर शुकशुकाट


नेहमी गजबजलेल्या मोशी जकात नाक्यावर शुकशुकाट 
वाहतूकदारांमध्ये समाधान 
वाहतूककोंडीही सुटली 


खेड तालुक्याच्या हद्दीतून पिंपरी-चिंचवड हद्दीत प्रवेश करताच जकाती साठी मोशी (ता. हवेली) येथे तासंतास थांबण्याची सवय पडलेल्या माल वाहतूकदारांना आता हा अडथळा राहिलेला नाही.कित्येक वर्षांपासून अहोरात्र  कार्यरत असणारा  पिंपरी चिंचवड हद्दीतील हा जकात नाका  आता बंद झाला आहे .महापालिका हद्दीत  स्थानिक संस्था कर लागू झाल्याने जकात वसुली थांबविण्यात आली असून, या नाक्‍यांवरील वाहनांची प्रचंड वर्दळ आणि चाकण सह उत्तर पुणे जिल्ह्यातून पुण्याला जाताना हमखास अनुभवावी लागणारी वाहतूक कोंडी आता होत नसून उलट नेहमी गजबजलेल्या या भागात शुकशुकाट पहावयास मिळत आहे.
 
 खेड तालुक्यातून अथवा चाकण औद्योगिक भागातून पिंपरी चिंचवड परिसरात जाताना प्रवासा साठी लागणाऱ्या वेळे पेक्षा मोशी येथील जकात नाक्यावर जकाती साठी अधिक वेळ लागतो अशी येथील वाहतूक दारांची नेहमीची तक्रार होती. आता हा जकात नकाच बंद झाल्याने वाहतूक दारांनी सुटकेच श्वास घेतला आहे. सोमवारपासून (दि .1) महापालिका हद्दीत एलबीटी (स्थानिक संस्था कर) लागू केल्याने हे जकात नाके बंद झाले आहेत.त्यामुळे एरवी वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या मोशी येथील  जकात नाक्‍यावर (क्रमांक 2) गेल्या चार दिवसांपासून मात्र शुकशुकाट दिसत आहे. जकात बंद झाल्याने या जकात नाक्‍यावर येणाऱ्या सुमारे ऐंशी टक्के वाहनांची संख्या कमी झाली आहे.नेहमी वाहन चालकांनी गजबजलेल्या जकात भरण्याच्या खिडक्‍यांवर शुकशुकाट पहावयास मिळत आहे .मात्र एलबीटीची माहिती नसल्याने अद्यापही काही वाहनचालक सवयीप्रमाणे थांबून जकातीबाबत चौकशी करताना दिसून येत आहेत. दरम्यान चाकण मधील  छोट्या व्यापाऱ्यांना या कराचा भुर्दंड सोसावा लागेल, त्यामुळे महागाई वाढेल, या मुद्द्यावर एलबीटीच्या विरोधात एक दिवस बंद मध्ये सहभागी होऊन एक दिवसाचा लाक्षणिक बंद केला होता . त्यानंतर आपले व्यवहार सुरळीत सुरु केले होते.मात्र येथील व्यापाऱ्यांना व्यवसायाकरिता लागणारा बहुतांश माल पुणे व पिंपरी-चिंचवड भागातील व्यापाऱ्यांकडून उपलब्ध होत असतो ,मात्र महापालिका हद्दीतील व्यापाऱ्यांचा बंद लांबत चालल्याने ग्रामीण भागातील व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
-------------          अविनाश दुधवडे,चाकण, ९९२२४५७४७५ 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)