सत्ताधारी आणि विरोधकांचे गळ्यात गळे


सत्ताधारी आणि विरोधकांचे गळ्यात गळे


अविनाश दुधवडे : 
 खेड तालुक्यात विविध विकास प्रकल्प येत आहेत ,भामा आसखेडच्या पाण्यावर शेती फुलविण्याचे आश्वासन देवून हेच पाणी पुण्यासह अन्यत्र पळविण्याचा घाट घातला जात आहे,विमानतळाच्या हालचालींनी वेग घेतला आहे,गुन्हेगारीने सामान्य नागरिकांना भयभीत केले आहे,विकासाचा विचार दाखवून सामन्य माणूस नागविला जात आहे,जमिनी लाटल्या जात आहे,किमान सुविधांपासून नागरिक वंचित आहेत,अशी परिस्थिती खेड तालुक्यात असली  तरी खुद्द सामान्य  माणूस ,शेतकरी यांनाच पुढे येवून या व्यवस्थेशी दोन हात करण्याची वेळ आली आहे.कारण आहे विरोधी पक्षाचा खेड तालुक्यात क्षीण झालेला(केलेला) आवाज .

  विरोधकांना निरनिराळ्या अडचणीच्या कामात योग्य ती मदत करून सत्ताधारी मंडळीनी गप्प केले आहे ,असा सामान्य जनतेचा पक्का समाज झाला आहे.खेड पंचायत समितीच्या निवडणुकांनंतर कोणत्या पक्षाच्या सहकार्याने पंचायत समितीवर राष्ट्रावादीचा झेंडा लागला आणि त्या बदल्यात त्यांना काय मिळाले हे साऱ्या तालुक्याने पहिले आहे.अशा अनेक घटना गावोगावी घडत आहेत.आमदार गट आणि आणि त्यांचे काही विरोधक वेगवेगळ्या संस्थांमध्ये गळ्यात गळे घालून सत्ता गाजवत आहेत. विरोधी पक्षाचे म्हणून मिरवणारे राष्ट्रवादीच्या अर्थात आमदार मोहिते यांच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावत आहे.राष्ट्रवादीला अपेक्षित आणि पूरक असलेली आंदोलने हाती घेतली जात आहेत.सत्ते पुढे शहाणपण चालत नाही असे म्हणत सत्तेपुढे माना तुकविणारी विरोधी पक्षातील काही मंडळी पाहून सामान्य जनता अवाक् होत आहे.विरोधक म्हणून मिरवणारी काही मंडळी सत्ताधाऱ्यांच्या गुप्त बैठकांना उपस्थित राहत असल्याची बाब आता लपून राहिलेली नाही.विरोधकांना क्षीण करण्याचा आणि आपले इरादे साध्य करण्याचा पुरेपूर प्रयत्न सत्ताधारी मंडळीनी गेल्या काही वर्षात सातत्याने केल्याचे स्पष्ट झाले आहे.
  खेड तालुका म्हणजे विरोधी पक्षांसह स्वकीयांचीही भीडभाड न ठेवणाऱ्या आमदार दिलीप मोहिते-पाटील  यांचा मतदारसंघ अशी ओळख गेल्या काही वर्षात निर्माण झाली आहे . दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर मोहिते  यांनी येथील स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीचे अधिपत्य राहील याची दक्षता घेतली. या काळात कधी त्यांचे कट्टर विरोधक म्हणून गणले जाणारे अनेक मातब्बर त्यांनी आपल्या गोटात सामील करून घेतले . असे करताना त्यांनी विरोधी पक्षांना क्षीण ठेवण्याचाही पुरेपूर प्रयत्न केला.सद्यस्थितीत अपवाद वगळता विरोधी पक्ष केवळ नावापुरते शिल्लक ठेवण्याचे काम आमदार मोहिते यांनी स्वतःचे राजकीय कौशल्य वापरून केले आहे असे अनेकजन आता उघड पणे बोलू लागले आहेत.
-----------          Avinash Dudhawade,chakan 9922457475








 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)