संपादकांवरील हक्कभंगाचा खेड पत्रकार संघाकडून निषेध


संपादकांवरील हक्कभंगाचा खेड पत्रकार संघाकडून निषेध

-----------

  पीएसआय सचिन सूर्यंवळी यांना मारहाण करणार्‍या आमदारांवर टीका केल्यामुळे आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे आणि एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्याविरूध्द आणण्यात आलेल्या हक्कभंगाचा प्रस्तावा बाबत चाकण येथे शुक्रवारी झालेल्या बैठकीत खेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे .
   आयबीएन लोकमत चे संपादक निखिल वागळे आणि एबीपी माझा चे संपादक राजीव खांडेकर यांच्याविरुद्ध हक्‍कभंग ठराव दाखल करून घेण्यात आला,असा हक्कभंग दाखल करून घेताना प्रचलित नियमांना तिलांजली देण्यात आली व या संपादकांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही हा प्रकार दुर्दैवी असल्याचे जेष्ठ पत्रकार व राजगुरुनगर बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र सांडभोर यांनी म्हटले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य व निर्भीड पत्रकारितेची होणारी गळचेपी दुर्दैवी असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क बजावणार्‍या पत्रकारां विरोधात कुठलीही कारवाई करू नये ,माध्यमांना आपलं म्हणणं मांडण्याचा पूर्ण स्वातंत्र असलं पाहिजे असे परखड मत खेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश दुधवडे  यांनी मांडले. एखाद्या व्यक्तीला त्यावर आक्षेप असल्यास त्यांना कायदेशीर मार्ग खुले आहेत हक्कभंगासारख्या कायद्याचा वापर अतिशय काळजीपूर्वक आणि टोकाच्या परिस्थितीत व्हायला हवा अशी भूमिका पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ सांडभोर यांनी मांडली.खेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश दुधवडे,माजी अध्यक्ष कोंडीभाऊ पाचारणे ,विद्याधर साळवे, पत्रकार हरिदास कड यांनीही या हक्कभंगास तीव्र विरोध केला आहे.पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष तुकाराम बोंबले सदस्य नंदकुमार मांदळे ,दत्ता भालेराव,अतुल काळे,रुपेश बुट्टे पाटील,कल्पेश भोई,हनुमंत देवकर,रामचंद्र सोनवणे ,एम.डी.पाखरे ,संजय शेटे ,सुनील थिगळे ,सुनील बटवाल, ऍड.विलास काटे ,शिवाजी आतकरी, सुनील ओव्हाळ, संजय बोथरा, संजय बोरकर, वनिता कोरे, ए.पी.शेख,हनुमंत देवकर,संदीप मिरजे,सदाशिव अमराळे,बाळासाहेब सांडभोर, महेंद्र शिंदे, राजेंद्र लोथे, निवृत्ती नाईकरे,नाजीम इनामदार, रवी साकोरे,दशरथ खाडे,इसाक मुलानी,रुपेश बुट्टे पाटील,राजेंद्र मांजरे, कुंडलिक वाळूंज, किरण खुडे,  भागवत पेठकर,कमल दुंडे,भानुदास पर्हाड,अशोक टिळेकर,अर्जुन मेदनकर,प्रभाकर जाधव,दशरथ खाडे ,धर्मराज पवळे,कुमार नवरे,आदिनीही या बाबत नाराजी व्यक्त केली आहे.
------------
------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)