रस्त्यावर उभी करण्यात येतात अवैध प्रवासी वाहने
रस्त्यावर उभी करण्यात येतात अवैध प्रवासी वाहने
चाकण:
अवैधरीत्या चालणाऱ्या प्रवासी वाहतुकीला या भागात उधाण आले असून संगीताच्या तालावर भरधाव वेगाने शेकडो ऑटो, कमांडर, ट्रॅक्स वाहनांद्वारे अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे.एस. टी.स्टॅन्डच्या परिसरात , पुणे-नाशिक महामार्गावर, शिक्रापूर रस्त्यावर आणि रस्त्यालगतच्या सर्व्हिस रस्त्यांवर (सेवा रस्ते) लागूनच अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी करण्यात येत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे.
पीएमपीएमएल च्या बस,एसटी ज्या ठिकाणाहून सुटते तेथेच सहाआसनी व तीनआसनी रिक्षावाल्यांनी बेकायदा शिरकाव केला असूनसर्वच चौकांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक वाले एसटीच्या पुढेच आपल्या रिक्षा लावत आहेत. सहाआसनी रिक्षावाले अवैध जीप वाली मंडळी स्टॅन्डच्या तोंडावरच उभे राहून बेकायदा व्यवसाय करीत आहेत.राज्य सरकारने अवैध वाहतूक रोखण्यासाठी कायदा केला असून पोलीस यंत्रणेच्या समोरच ही वाहतूक केली जाते. सहाआसनी रिक्षात केवळ सहाच प्रवासी बसविले पाहिजेत, असा नियम असतान देखील दुप्पट तिप्पट प्रवाशांची बेकायदा वाहतूक सर्रास केली जाते. एखादी एसटी जात असेल व त्याच मार्गावरून सहाआसनी रिक्षा जात असेल तर हे रिक्षाचालक एसटीला जायला जागा न देता जाणूव बुजून अडवणूक करत असतात.मात्र सर्वात धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ( एस.टी.) ही महाराष्ट्र राज्यात रस्त्यांवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी कार्यरत असलेल्या राज्य सरकारच्या कंपनीतल्या या भागातील काही मंडळींना या अवैध प्रवासी वाहतूक वाल्या मंडळीनी हाताशी धरून आपला गल्ला एस.टी महामंडळापेक्षा वाढविण्याचा प्रकार सुरु केला असल्याची परिसरात चर्चा आहे.
म्हणून नाईलाज:
तालुक्यात अनेक तरूणांनी कर्ज काढून स्वत:ची तीन व चारचाकी वाहने घेऊन प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय सुरू केला आहे. डोक्यावरील बँकेचे कर्ज मिटविण्यासाठी व संसाराचा गाडा चालविण्यासाठी अवैध असला तरीही हा व्यवसाय करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही. त्यामुळे पोलिसांशी हातमिळवणी करीत ते आपला व्यवसाय सुरूच ठेवतात. एसटीच्या गलथान कारभारामुळे प्रवासीही अवैध वाहतुकीचा वापर करतात. अधिकारी मंत्री येणार असल्यास पोलिसच अवैध वाहतूक त्यांच्या नजरेस पडू नये यासाठी दक्षता घेतात .मुळात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालताना एसटीचा कारभार सुधारावा अशी रास्त मागणी प्रवाशांची आहे.
---------
अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा