उन्हाळ्याच्या चाहुलीने माठ बाजारात दाखल



उन्हाळ्याच्या चाहुलीने माठ बाजारात दाखल
चाहूल उन्हाळ्याची
चाकण:
यंदा फेबु्रवारीमधील उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरूवात झाली आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे उन्हाळा हा लवकर जाणवायला लागला आहे  . त्यामुळे कडाक्याच्या उन्हात थंड पाण्याने दिलासा देणारे मातीचे माठ बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहेत.विविध आकारांच्या या माठांना मोठी मागणी असल्याने यंदा त्यांच्या किंमतीत 5 ते 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
  या भागात माठाची दुकाने रस्त्यावर ठिकठिकाणी थाटलेली दिसत आहेत. शहराच्या विविध भागासह पुणे नाशिक रस्त्यावर आंबेठाण चौकासह ठीक ठिकाणी रस्त्याच्या कडेला माठ विक्रेत्यांनी माठ विक्रीस ठेवले आहेत.गरीबांचा फ्रीज अशी ओळख असलेल्या,या माठांची विक्री करण्यासाठी राजस्थान, मध्यप्रदेशासह विविध राज्यांतील व्यवसायिक शहरात दाखल झाले आहेत. बाजारातील राजस्थानी व्यवसायिकांचे लाल रंगांचे माठ सर्वांचे लक्ष वेधुन घेत आहेत. या माठांवर करण्यात आलेल्या बारीक नक्षीकामामुळे ते ग्राहकांसाठी आकर्षण ठरत आहेत. महागाईच्या काळात आता माठाच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रत्येक माठावर पाच ते दहा  रुपयांनी वाढ झाली आहे. बाजारात 100 ते 200 रुपयांपर्यंत माठ विक्रीस उपलब्ध आहेत. सध्या दिवसाकाठी 15 ते 25 माठांची विक्री होत आहे, अशी माहिती एका माठ विक्रेत्या ने  दिली.
   माठामध्ये तीन प्रकार असून त्यामध्ये काळ्या रंगाच्या माठाला जास्त मागणी आहे. तर नळ असलेला माठांना मध्यमवगीर्य लोकांची विशेष पसंती असून ते 70 ते 100 रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर राजस्थानी लाल रंगाच्या माठांच्या किंमती कलाकुसर असल्याने ते अधिक आहेत. उन्हाळा वाढल्यानंतर माठाची मागणी वाढेल असा विश्वास माठ विक्रेत्यांना आहे.
-------      अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)