कॉसमॉस बँकेच्या 120 व्या शाखेचे चाकणला उद्घाटन


कॉसमॉस बँकेच्या 120 व्या शाखेचे चाकणला उद्घाटन

चाकण:अविनाश दुधवडे
उद्योग नगरी म्हणून नावारूपाला आलेल्या चाकण भागात ग्राहकांना अपेक्षित असणाऱ्या व अन्य बँकांकडून न मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचा कॉसमॉस बँक प्रयत्न करणार आहे असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी आज (दि.30)येथे केले.
 कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेच्या 120 व्या शाखेचे चाकण (ता.खेड) येथे उद्घाटन आज करण्यात आले,त्या प्रसंगी गोयल बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किशोर पंप्स लिमिटेडचे अध्यक्ष किशोर देसाई होते. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष मिलिंद काळे,मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विक्रांत पोंक्षे
बँकेच्या चाकण शाखेचे अधिकारी विवेक इनामदार,विनायक जोशी,माधुरी मराठे ,हिंदुस्थान ग्रुपचे अध्यक्ष संजय राऊत ,राजेंद्र घनवट,मधुकर अत्रे,प्रल्हाद कोकणे,सुहास गोखले,हिमानी गोखले आदींसह बँकेचे अधिकारी ,कर्मचारी,व चाकणकर नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.पुढे बोलताना गोयल म्हणाले की,कॉसमॉस को - ऑपरेटिव्ह बँकेने इंटरनेट बँकिंग सुविधे सह सर्व प्रकारच्या सुविधा सुरु केल्या आहेत.नेट बँकिंग सुविधेच्या माध्यमातून खात्यातील व्यवहारांविषयीचा सविस्तर माहिती , शिल्लक पाहणे , चेकबुकची मागणी नोंदविणे , विविध प्रकारच्या ठेवींसंदर्भात सूचना देणे , ' टीडीएस ' बद्दलची माहिती घेणे , दिलेल्या चेकबद्दलची तपशिलवार माहिती घेणे , विनंतीनुसार डिमांड ड्राफ्टची मागणी करणे अशा पध्दतीच्या विविध सेवासुविधा ग्राहकांना इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या उपलब्ध होणार आहेत. कुठल्याही पक्षाशी संबंधित नसणाऱ्या व निष्पक्ष पणे काम करणाऱ्या या बँकेत उद्योजकांपासून सर्वसामान्य माणसाला केंद्रीभूत मानून सर्व प्रकारचे निर्णय घेतले जातात.किशोर पंप्स लिमिटेडचे अध्यक्ष किशोर देसाई यांनी बँकेच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की,सामाजिक बांधिलकी जपून काम करणाऱ्या या बँकेने सभासदांच्या हितालाच आज पर्यंत सर्वाधिक प्राधान्य दिले आहे.ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावरच बँकेकडे कोट्यावधी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत.बँकेचे उपाध्यक्ष मिलिंद काळे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.विक्रांत पोंक्षे यांनी प्रसाविक करून उपस्थितांचे आभार मानले.तत्पूर्वी किशोर देसाई यांच्या हस्ते फीत कापून व दीपप्रज्वलन करून बँकेचे उद्घाटन करण्यात आले. चाकण औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखानदार आणि ग्राहकांच्या अनेक दिवसांच्या आग्रहानंतर चाकण येथे बँकेने अखेर चाकण तळेगाव रस्त्यावरील घनवट प्लाझा येथे ही अद्ययावत शाखा सुरु केली आहे.

---------
             Avinash Dudhawade,chakan 9922457475





 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)