स्वामी समर्थांच्या सत्य घटना येणार पडद्यावर


स्वामी समर्थांच्या सत्य घटना येणार पडद्यावर 
खेड तालुक्यातल्या युवकाचा प्रयत्न


''भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे.'' असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या विविध सत्य घटनांवर सखोल प्रकाशझोत टाकणारा नवीन मराठी चित्रपट खेड तालुक्यातील एक भूमिपुत्र तयार करीत असून तालुक्यातल्या विविध गावांमध्ये याचे चित्रीकरण सुरु आहे.जेष्ठ अभिनेते कुलदीप पवार,मधु कांबीकर यांच्या सोबतीला अनेक मराठी तार तारका घेवून खेड तालुक्याच्या भूमीत चित्रित होत असलेला हा चित्रपट मराठी प्रेक्षक आणि स्वामींच्या भक्तांसाठी पर्वणी असणार आहे.
 खेड तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील भगवान मेदनकर हे चित्रपटाचे निर्माते आहेत.मेदनकर यांनी या चित्रपटाबाबत सांगितले की,अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्या जीवनातील अनेक सत्य घटनांवर आधारित असलेला 'हम गया ,नही जिंदा हुं ' हा नवीन चित्रपट महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी आणला जात आहे .लीनेश घाडगे यांनी या चित्रपटाचे पटकथा-संवाद लिहिले आहेत,अनेक यशस्वी चित्रपटांचे छायाचित्रण केले नाना खेडेकर यांनीच या चित्रपटाचे छायाचित्रण केले आहे.अभय कीर्ती यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता सुजित मुकटे असून या चित्रपटात जेष्ठ अभिनेते कुलदीप पवार ,मधु कांबीकर,नयना मुके,सुषमा सातपुते,भगवान मेदनकर ,सुरेश विश्वकर्मा,आरती गौड,राहुल बेलापूरकर यांच्या भूमिका आहेत. कुलदीप पवार यांनी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका केली आहे. तर अन्य अनेक मराठी कलाकारांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत.
-------
------- Avinash Dudhawade,chakan 9922457475

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)