साबळेवाडी खून प्रकरणी माहिती
मिळविण्यासाठी भित्ती पत्रके
चाकण:
साबळेवाडी (ता. खेड ) येथे आठवड्याभरापूर्वी (दि.21 एप्रिल)क्रूररित्या गळा चिरून विहिरीत फेकलेल्या महिलेची ओळख पटविण्यात अद्यापही यश न आल्याने चाकण पोलिसांनी या प्रकाराबाबत ठीकठिकाणी भित्तीपत्रके लावून काही माहिती हाती लागते का? यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
मागील आठवड्यात 50 ते 55 वर्षीय अनोळखी महिलेची गावच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीच्या कठड्यावर धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करून मृतदेह पाण्यात फेकून दिल्याची घटना साबळेवाडीत मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आल्या नंतर उघडकीस आली होती . क्रूर पद्धतीने गळ्याचा कंठ याच विहिरीच्या काठावर कापून मृतदेह विहिरीत फेकण्याच्या प्रकाराने साबळेवाडी भागात खळबळ उडाली होती. हा मृतदेह जवळपासच्या भागातील महिलेचा असल्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपास करण्यात आला आहे. आसपासच्या पोलिस ठाण्यात या वर्णनाची महिला बेपत्ता असल्याची नोंद झाली आहे का,याचीही चौकशी करण्यात आली.साबळेवाडी व आसपासच्या गावातील लोकांना याची माहिती देऊन मृतदेहाची ओळख पटते का, या दृष्टीनेही तपास करण्यात आल्या नंतर या महिलेची ओळख काही केल्या पटवीताच येत नसल्याने हात टेकलेल्या पोलीस प्रशासनाने भित्तीपत्रकांचा आधार घेतला आहे.ही भित्ती पत्रके चाकण परिसरासह ,साबळेवाडी ,शिक्रापूर,चौफुला,लोणावळा,पुणे शहर,आळंदी,भोसरी,व जिल्ह्याच्या बहुतांश पोलीस ठाण्यात आणि सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आली असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी सांगितले.
-------------
अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा