पीडब्लूडीची जागा भाजी विक्रेत्यांना मिळणार ?
पीडब्लूडीची जागा भाजी विक्रेत्यांना मिळणार ?
खेड बाजार समिती व चाकण ग्रामपंचायत नोटीस प्रकरण
चाकण:वार्ताहर
चाकण ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनान यांनी चाकण मार्केट यार्ड समोरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागील मोकळ्या जागेत बसण्यास या भाजी विक्रेत्यांनी सुरुवात करावी असे सांगितले होते,मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने कांदा उतरविण्यासाठी तात्पुरती परवानगी दिलेल्या बाजार समितीला आणि चाकण ग्रामपंचायतीला नोटीस काढून अतिक्रमणे करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला असला तरी ही जागा भाजी विक्रेत्यांना मिळेल अशी आशा अद्यापही या पदाधिकाऱ्यांना आहे.
चाकण पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाकडून भाजी विक्रेत्यांवर अतिक्रमण कारवाई होते. चाकण ग्रामपंचायतीने चाकण च्या पोलीस अधिकाऱ्यांनी या भाजी विक्रेत्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागील मोकळ्या जागेत बसण्यासाठी सूचना केल्या होत्या. मात्र तेथे खुद्द सार्वजनिक बांधकाम विभागानेच नोटिशी काढून हरकत घेतल्याने व कारवाईचा इशारा दिल्याने भाजी विक्रेत्यांचा प्रश्न पुन्हा टांगणीला लागला असला तरी या बाबत चाकण चे सरपंच काळूराम गोरे व उपसरपंच साजिद सिकीलकर यांनी चाकण चा वाढता विस्तार पाहता भाजी विक्रेत्यांसाठी ती जागा मिळावी अशी ग्रामपंचायतीची ठाम भूमिका असून ती जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले आहे.मात्र खेड कृषी उत्पन्न बाजार समितीनेही खेड चे आमदार दिलीप मोहिते यांच्या माध्यमातून चाकण मार्केट यार्ड समोरील सार्वजनिक बांधकाम विभागाची मोकळी जागा जनावरांच्या बाजारासाठी मिळावी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले होते .मात्र यासाठी असणारे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेच नव्हते .त्यामुळे ते प्रयत्न निष्फळ झाले होते.आता चाकण ग्रामपंचायतीने यासाठी प्रयत्न चालविले असले तरी त्यास कितपत यश मिळेल या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा