आधार नोंदणीसाठी चाकणला चार मशीन
आधार नोंदणीसाठी चाकणला चार मशीन
चाकण:वार्ताहर
नागरिकांकडून होऊ लागलेली जोरदार मागणी व वर्तमानपत्रांमधून वारंवार चव्हाट्यावर आलेल्या चाकण परिसरातील रखडलेल्या आधार नोंदणीच्या वृत्तांमुळे अखेर चाकण मध्ये चार मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.चाकण मधील जिल्हा परिषद प्रशालेत(मराठी शाळा) आधार नोंदणीचा हा दुसरा अध्याय सुरु
झाला असून आधार नोंदणी न झालेल्या नागरिकांनी ही आधार नोंदणी करून घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे .
मागील वर्षी जानेवारी महिन्यामध्ये बंद करण्यात आलेली आधार कार्ड नोंदणी बंद झाल्या पासून चाकण परिसरात पुन्हा सुरू करण्यात आलेली नव्हती . वर्षभराच्या खंडा नंतर मागील काही दिवसांपूर्वी चाकण मधील कोहिनूर सेंटर येथे महा ई सेवा केंद्रात सुरु करण्यात आलेले खाजगी आधार कार्ड केंद्र एका
महिन्यातच बंद करण्यात आली होती. आधार कार्ड नागरिकांना विविध योजनांसाठी गरजेचे ठरत आहे.आधार कार्ड मिळालेल्या नागरिकांची अल्प संख्या पाहता
शासनाने ही सेवा पुन्हा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती.
शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही आता आधारची सक्ती केली आहे, तर बॅंक खाते, शासकीय सवलती, वस्तू खरेदीसाठीही आधार कार्डची सक्ती होत
असल्याने बहुतांशी नागरिक, सर्व विद्यार्थी "निराधार' बनले होते . चाकण मधील एजन्सी मागील वर्षी गायब झाल्याने अनेकांची नोंदणी झाली नव्हती.त्या
नंतर पोस्ट कार्यालातील आणि नंतर सुरु झालेल्या कोहिनूर सेंटर मधील आधार नोंदणीचे कामही अचानक बंद करण्यात आले होते. त्यातच काही प्रशालांनी आधार कार्डसाठी 'डेडलाईन' ठरवून दिल्याने पालकही अस्वस्थ झाले होते.चाकण टाईम्सनेही या बाबत वारंवार वृत्ते देवून चाकणकरांची व्यथा शासनासमोर
मांडली होती.त्याच पार्श्वभूमीवर चाकण भागासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या चार मशीन मुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.चाकण परिसरातील
आधार नोंदणी न झालेल्या नागरिकांनी लवकरात लवकर आधार नोंदणी करून घ्यावी असे आवाहन चाकणचे मंडलाधिकारी मोराळे यांनी केले आहे.
---------- Avinash Dudhawade,chakan 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा