कॉसमॉस बँकेच्या 120 व्या शाखेचे चाकणला उद्घाटन
कॉसमॉस बँकेच्या 120 व्या शाखेचे चाकणला उद्घाटन चाकण:अविनाश दुधवडे उद्योग नगरी म्हणून नावारूपाला आलेल्या चाकण भागात ग्राहकांना अपेक्षित असणाऱ्या व अन्य बँकांकडून न मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचा कॉसमॉस बँक प्रयत्न करणार आहे असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी आज (दि.30)येथे केले. कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेच्या 120 व्या शाखेचे चाकण (ता.खेड) येथे उद्घाटन आज करण्यात आले,त्या प्रसंगी गोयल बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किशोर पंप्स लिमिटेडचे अध्यक्ष किशोर देसाई होते. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष मिलिंद काळे,मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विक्रांत पोंक्षे बँकेच्या चाकण शाखेचे अधिकारी विवेक इनामदार,विनायक जोशी,माधुरी मराठे ,हिंदुस्थान ग्रुपचे अध्यक्ष संजय राऊत ,राजेंद्र घनवट,मधुकर अत्रे,प्रल्हाद कोकणे,सुहास गोखले,हिमानी गोखले आदींसह बँकेचे अधिकारी ,कर्मचारी,व चाकणकर नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.पुढे बोलताना गोयल म्हणाले की,कॉसमॉस को - ऑपरेटिव्ह बँकेने इंटरनेट बँकिंग सुविधे सह सर्व प्रकारच्या सुविधा सुरु केल्या आहेत.नेट बँकिंग सुविधेच्या माध्यमातून खात्य