..अन एस.टी बस चालकाने काळाला धरले रोखून
..अन एस.टी बस चालकाने काळाला धरले रोखून
चाकण मधील घटना ; तिघे किरकोळ जखमी
चाकण : (अविनाश दुधवडे)
ब्रेक निकामी झालेल्या वेगवान एस.टी बस ला मोठ्या वर्दळीच्या चौकात घुसण्यापूर्वी रस्ता दुभाजकावर चढवून वेग कमी करण्याच्या यशस्वी
प्रयत्न केल्याने मोठी दुर्घटना टाळीत चक्क काळालाच रोखून चालकाने अनेक निरपराध प्राण वाचविल्याची घटना आज (दि.27) सायंकाळी
सव्वा चार वाजनेचे सुमारास पुणे -नाशिक महामार्गावर चाकण(ता.खेड) येथील आंबेठाण चौकात घडली. मात्र या घटनेत ब्रेक अचानक निकामी
झाल्याने एस.टी बसेस च्या दयनीय अवस्थेचा विषय ऐरणीवर आला आहे.
मोठा अनर्थ टळला असला तरी या घटनेत एका दुचाकीस्वारासह विरुद्ध दिशेने जाणाऱ्या एका खाजगी बस मधील दोघे जन जखमी झाले आहेत.
याबाबतचे वृत्त असे कि , आज सायंकाळी सव्वाचार वाजनेचे सुमारास शिवाजीनगर आगाराची नाशिक - पुणे एस.टी बस ( क्रमांक -एम.एच 12-
इ एफ 6396) मोठ्या संखेने प्रवासी घेऊन पुण्याकडे जात असताना
चाकण च्या आंबेठाण चौका लगतच्या उड्डाण पुला वरील उतारावरून वेगात येत असताना या बस चे ब्रेक अचानक निकामी झाले.चालकाच्या
लक्षात ही बाब आल्या बरोबर त्याने हि बस अति वर्दळीच्या चाकण मधील आंबेठाण चौकात पोहचण्यापूर्वी पन्नास फुट आधीच रस्ता दुभाजकावर
चढविली .त्याच वेळी समोरून येणाऱ्या मैत्रेय ट्रान्स्पोर्टच्या कामगार घेऊन जाणाऱ्या खाजगी बस ला( क्रमांक - एम एच 04 क्यू 6370) व एका
दुचाकी स्वाराला या एस.टी बस ठोस बसली त्यामध्ये तिघे जन किरकोळ जखमी झाले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या
होत्या. पोलिसांनी अपघात ग्रस्त वाहने तातडीने बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली .जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले
असून चाकण पोलिसांनी एस.टी बस चा चालक ज्योतिराम नरहरी सुर्वे यास ताब्यात घेतले आहे. एस.टी महामंडळाचे अधिकारी एस.पी.साबळे,
टी.एन.पवळे यांनी घटनास्थळी येऊन पहाणी केली असून ब्रेक निकामी झाल्यानेच ही दुर्घटना घडल्याचे सांगितले. चाकण पोलिसांनी या प्रकरणी रात्री
उशिरा पर्यंत कोणावरही कारवाई केली नव्हती.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा