औद्योगीकरण आणि चाकण ची वाढती वाहतूक कोंडी
वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. नागरिक संताप व्यक्त करत असले तरी संबंधितांना मात्र या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज वाटत
नाही. वाहतूक कोंडी ही फक्त या भागातील महामार्गावरच नव्हे तर शहरातील अंतर्गत रस्त्यावरीलही समस्या आहे .ही समस्या दुचाकी स्वार ,पादचारी यांच्या सह
चारचाकी वाहनचालकांना भेडसावत आहेत.
शहरातील या वाहतूक कोंडीची समस्या कशी सोडवायची याबाबत कुणीच विचार करत नसल्याने आलीया भोगाशी अशीच नागरिकांची अवस्था झाली आहे.
वाहनांची वाढलेली संख्या, रिक्षा व सिक्स सिटर रिक्षांची वाढलेली वर्दळ, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष, बेशिस्त वाहनचालक अशा विविध कारणांमुळे होणार्या
वाहतूक कोंडीचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागत आहे. येथील विविध शहरात आज वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. रोज मरे त्याला कोण रडे असे बोलून
कदाचित पोलीस सुध्दा आता वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष करत असावेत कारण कुणीच या समस्येकडे गांभीर्याने पाहण्यास तयार नाही. भर गर्दीत थांबणार्या
सहा आसनी रिक्षा, बेशिस्तपणे उभी करण्यात आलेली वाहने विविध बँकेच्या समोर थांबणारी वाहने याकडे वाहतूक पोलिसांनी जर लक्ष दिले तर वाहतूक कोंडी
बर्यापैकी सुटेल. पेण सारख्या ठिकाणी तर नागरिकांच्या बाइक्स उचलून नेण्यासारखी कारवाई सुद्धा होत नसल्याने रस्त्या लगत पर्यंत दुचाक्या बिनधास्त
लावल्या जात आहेत .मात्र बेशिस्त वाहन चालकांना मुभा दिली जात आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील तळेगाव चौक,आंबेठाण चौक येथे वाहतूक कोंडी ही जशी डोकेदुखी ठरली आहे त्याचप्रमाणे माणिक चौक ,महात्मा फुले चौक ,
जय महाराष्ट्र चौक ,नेहरू चौक ,मार्केट यार्ड ,जिल्हा परिषद मराठी शाळा भाग ,आदी अंतर्गत वाहतूक कोंडी देखील आता मोठी डोकेदुखी होऊ लागली आहे.
पोलीस, ग्रामपंचायत यांनी एकत्र येऊन शहरांमधील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी विशेष उपाय योजना करण्याची गरज आहे.
त्याशिवाय या समस्येतून नागरिकांची सुटका होणार नाही.कामाच्या वेळांमध्ये वाहतूक कोंडी होत असल्याने कामावर जाणारे नागरिक, शाळेत जाणारे विद्यार्थी
आदींना या वाहतूक कोंडीचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवतो. धुम स्टाइल बाईक चालवणार्यांचाही त्रास होत असून अशा रोड रोमिओंवर देखील कारवाई करण्याची
गरज आहे. वाढत्या वाहनांच्या वर्दळीमुळे शहरातील अपघातांचेही प्रमाण वाढले आहे. या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून तोडगा काढावा अशी
नागरिकांची मागणी आहे। ..........
अविनाश दुधवडे ,चाकण मो. ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा