आजा मेरी गाडी मे बैठ जा...


आजा मेरी गाडी मे बैठ जा....
आजा मेरी गाडी मे बैठ जा....
सभापती पदांसाठी चुरस
--------------------
येथील पंचायत समितीच्या सभापती उपसभापतींची निवड पंधरवड्यानंतर मार्चमध्ये होणार असली तरी तीत आतापासून राजकीय रंग भरण्यास सुरवात झाल्याने,
सत्ताधारी राष्ट्रवादी आणि विरोधात कॉंग्रेस सेना भाजपा हे विरोधक यांच्यात मध्ये काटे की टक्कर होणार असल्याने सावधगिरी म्हणून या राजकीय पक्षांनी आपापल्या काही
सदस्यांना लपवाछपवीसाठी प्रयत्न सुरू केले आहे. खास मर्जीतील वगळता अन्य सदस्यांना पळवापळवीचेही प्रयत्न सुरू झाले असून तोडफोडीच्या राजकारणालाही
वेग आला आहे.आपला झेंडा पंचायत समितीवर फडकवा यासाठी कुंपणावरील मंडळींना 'आजा मेरी गाडी मे बैठ जा' ...अशा ऑफर्स सुरु आहेत.
एक अपक्ष आणि भाजपच्या एका उमेदवाराची भूमिका राष्ट्रवादीसाठी निर्णायक ठरणार असल्याचे त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.राष्ट्रवादी कडे
निम्मे संख्या बळ असले तरी काहींची तोंडे वेगळ्या दिशेला आहेत.तर आमदार मोहिते यांच्या विरोधानंतरही निवडून आलेल्या त्यांच्याच पक्षाच्या एका महिला
पंचायत समिती सदस्याची भूमिकाही निर्णायक ठरणार असल्याची चर्चा आहे.
पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिला साठी आरक्षित असल्याने बहुमताचा जादुई आकडा गाठून कोणता पक्ष नथीतून तीर मारण्यात
यशस्वी होतो या कडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.समसमान संख्याबळ सकृत दर्शनी दिसत असले तरी दोन्ही बाजूकडून आमचाच सभापती होईल असा
विश्वास व्यक्त होत असून ईश्वर चिठ्ठी वर यावेळी सभापती निवडला जाणार नाही अशी हमी दिली जात आहे.मात्र याबाबत ची नेमकी वस्तू स्थिती काय हे
पहाण्यासाठी आणखी पंधरा दिवस वाट पहावी लागणार आहे.


अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)