पोलिस अधिक्षकांपुढे पोलीस निरीक्षकांवर अंकुश ठेवण्याचे आव्हान विभागातही सावळागोंधळ

--------

वरिष्ठ पदाच्या अधिकाऱ्यांमुळे गुन्हेगारीवर अंकुश बसणार, की गुन्हेगारी लोकांना पोलिस मित्राचा दर्जा देऊन सर्वसामान्यांवर अंकुश ठेवणार, याबाबत पुणे
जिल्ह्यातील औद्योगिक भागातील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावामध्ये उलटसुलट चर्चा गेल्या काही काळापासून सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे .

पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना यावर नियंत्रण ठेवणे शक्‍य न झाल्याने बहुतांश
पोलिस ठाण्याला निरीक्षक दर्जाचे अधिकारी मिळाले आहेत. पण त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. सहकारी कर्मचाऱ्यांनी परिसरातील अवैध धंदेवाल्यांना
दिलेला कारभारीचा दर्जा थोपविणे. अवैध व्यावसायिकांची पोलिस ठाण्यातील वर्दळ सर्वप्रथम थांबली पाहिजे. औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखान्यांतून
स्क्रॅप, कास्टिंगची चोरी होते. पण चोरी करणारे पोलिस मित्रांनाच चोरीचा माल विकत असल्याने कारखानदाराची तक्रारच नाकारली जाते. त्यातूनही तक्रार
द्यायचीच ठरवले, तर संशयित चोरांची नावे तुम्हीच सुचवा. आम्ही चौकशी करतो, असे सांगितले जाते. नावे दिल्यानंतर संबंधितांना मालकांनी मारहाण
केली, शिव्या दिल्या, अशी उलट तक्रार करण्यास सांगितले जाते. त्यामुळे कोणताही उद्योजक परत कितीही मोठी चोरी झाली तरी पोलिस ठाण्याकडे
जाण्याचे धाडस करत नाही. पोलिस ठाण्याच्या वाहतूक नियंत्रण विभागाने तर सर्व सीमा पार केल्या आहेत. एमआयडीसीमध्ये होणाऱ्या अनेक धंद्यांचा
हप्ता, सहा आसनी प्रवासी रिक्षांचा हप्ता, ऍपे रिक्षा, दगड खाणीत कामास असणारे डंपर आणि अगदी सेवा मार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण
करत उभी असणारी अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने यांच्याकडून मिळणारे हप्ते केवळ काही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत लाखाचा आकडा पार करतात.

गावठी दारूच्या भट्ट्या व गुत्ते, परिसरातील लॉजिंग, मटका व्यवसाय हे उद्योग तर हप्ते घेऊन पोलिस ठाण्याने परवाने दिल्यासारखेच सुरू आहेत.
प्रत्येक ठिकाणाहून गोळा करणाऱ्या हवालदाराचा रूबाब "कलेक्‍टर'ला लाजवेल, असाच आहे. रोज नवनवीन बकरे शोधून त्याला मोठ्या हॉटेलात मेजवानी
द्यायला लावायची आणि तेथेच "सेटलमेंट' करायची, हे चित्र येथील नागरिकांना नियमित अनुभवास येत आहे. त्यामुळे प्रथम आपल्या सहकारी
कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवून नंतर गुन्हेगारीवर अंकुश ठेवणे सगळ्याच पोलीस ठाण्यांच्या पोलीस निरीक्षकांसमोरील आव्हान आहे.
जिल्ह्याचे नेतृत्व करून राजकारणात दबदबा निर्माण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा यामध्ये प्रत्यक्ष संबंध असल्याची आणि त्यांच्या नेत्यांचे त्यांच्या
चेल्याचपट्यावर वरदहस्त असल्याची बाब आता लपून राहिलेली नाही.

*चाकणच्या मंडलाधिकार्यांचे झाले तरी काय; मृत्यूचे गूढ कायम ?

चार दिवसांपूर्वी चाकणच्या मंडलाधिकारी यांचा कोचीन मध्ये हॉटेलच्या तिसऱ्या
मजल्यावरून पडून झालेला दुर्दैवी मृत्यू अनेक बाबी अधिरेखीत करीत आहे.मंडलाधिकारी प्रकाश तनपुरे यांच्या त्या सहलीतील सहकाऱ्यांनी तनपुरे यांच्या मृत्यू
पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात मद्य प्राषन केल्याची बाब आता लपून राहिलेली नाही.रात्री दीड च्या सुमारास मृत्यू झालेल्या तनपुरे यांच्या मृत्यू बाबत त्यांच्या सहकाऱ्यांना
म्हणे सकाळी कळाले .कर्तव्य दक्ष म्हणून नावलौकिक असणारा अधिकारी सहकारी तलाठ्यांच्या रंगारंग
पार्ट्यां नंतर त्यांच्या समवेत असताना अचानक खोलीतून खाली पडतो आणि जागच्या जागी मृत्यूमुखी पडतो. हजारो मैलावर घडलेल्या अशा प्रकरणानंतर
सगळे प्रशासन मात्र चिडीचूप राहते .या मुळे या बाबी खूप पराकोटीला पोहचल्याची चर्चा होते .मात्र प्रशासनही फारसा बोध घेत नाही .त्यांच्या समवेत
असणारयांकडून रंगेल तलाठ्यांकडून माहिती घेऊन या घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न होत नाही . मुळात हजारो मैलांवरच्या त्या पार्टीचे आयोजन
कुठल्या आनंदात करण्यात आले होते ,की थंड डोक्याने याची रचना करण्यात आली होती ? अशा अनेक चर्चा नागरिकांमध्ये होत आहेत .प्रशासन मात्र
अशा गंभीर घटनांबद्दलही खंबीर पणे जाब विचारण्या एवजी आपला ढिम्म पणा सोडत नसल्याची सल लोकांच्या मनात आहेच.महसुली कर्मचाऱ्यांसह अन्य नेमके
कोण त्या सहलीत समाविष्ट झाले होते त्यांचा महसूल विभागाशी नेमका संबंध काय या बाबींवरही प्रकाश झोत पडला पाहिजे अशी उघड चर्चा नागरिक करीत आहेत.
त्यामुळे सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी कार्यरत असणारे पोलिस आणि अन्य प्रशासन गुन्हेगारांना संरक्षण देत असतील तर यासारखे दुर्दैव नाही अशी जन भावना
आहे. ...............................
अविनाश दुधवडे ,चाकण ( ९९२२४५७४७५)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)