फिरांगोजीने लेकराप्रमाणे मेहेनतीने राखला, सजविलेला चाकणचा संग्रामदुर्ग पोरकाच


फिरांगोजीने लेकराप्रमाणे मेहेनतीने राखला, सजविलेला चाकणचा संग्रामदुर्ग पोरकाच
*साडे तीनशे वर्षा पासून संवर्धन व जतनाच्या प्रतीक्षेत
*चाकणच्या संग्रामाचा साक्षीदार दुर्लक्षित
----------------
चाकण

पुण्यापासून 20 मैलावर वसलेले चाकण पूर्वीचे खेडेगाव तर सध्याचे वाहन उद्योगाने प्रचंड विस्तारते शहर. चाकण मध्ये दोन्ही पैकी कुठल्याही
वेशीतून प्रवेश केल्या नंतर अवघ्या काही अंतरावर जुन्या पुणे नाशिक रस्त्यावरून चालत आल्यास भग्नावस्थेतील तट बंदी दिसू लागते.
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या चाकण गावात संग्राम दुर्ग किल्ल्याचा कोट फक्त शिल्लक राहिला आहे. इतिहासाची पाने डोळयासमोर फडफडविनारा
चाकण चा भुईकोट संग्रामदुर्ग किल्ला आणखी काही वर्षांनी येथे होता असे सांगण्याची वेळ येणार हे निश्चित आहे

या किल्ल्याची सध्याची स्थिती पाहिल्यास येथे काही वर्षांनंतर किल्ला होता तरी का हे तपासण्याची गरज पडणार आहे .
अशी चाकणच्या संग्रामदुर्गाची स्थिती आहे. 21जून 1660 रोजी या किल्ल्याला मुघलांचा वेढा पडला.आणि त्या नंतर 55 दिवसांनी मोगलांच्या प्रचंड सैन्याने
कपटाने हा किल्ला काबीज केला.मोगलांच्या ताब्यात गेल्या नंतर सुरु झलेले संग्राम दुर्गाच्या दुरवस्थेचे सुरु असलेले फेरे अद्यापही कायम आहेत .
संग्रामदुर्गच्या तटबुरुंजावर वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे किल्ल्याच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे.आपण किल्ल्यात कधी येतो आणि कधी बाहेर
पडतो हे कळेनासे झाले आहे.किल्ल्यात खूप मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाल्याचा आरोप किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल वाडेकर
व त्यांचे सहकारी वारंवार करीत आहेत.या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पुरातत्त्व खात्या कडे संवार्धांची वारंवार मागणी केली आहे.शासना कडे वारंवार या बाबत
पाठपुरावा केला आहे. चाकण ग्रामपंचायतीने याबाबत चा ठराव शासनाकडे पाठविल्याचे सरपंच काळूराम गोरे,व उपसरपंच साजिद सिकीलकर यांनीही सांगितले.
मात्र शासनाकडून या बाबत कुठल्याही ठोस उपाय योजना झाल्याच नसल्याची वस्तुस्थिती आहे.सध्या या किल्ल्याच्या एका बुरुंजावर वर्षातून दोनदा (15ओगस्ट व
26 जानेवारी)शासकीय पद्धतीने ध्वजारोहणाचा कार्यक्रम होतो.स्मारक प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी या भागाची काही प्रमाणत साफ सफाई करून मुलांना
खेळण्याची व्यवस्था केली आहे.

शासनाने योग्य त्या उपाय योजना करून संवर्धनासाठी खरेखुरे प्रयत्न करावेत अशी माफक अपेक्षा दुर्गप्रेमी ,इतिहास संशोधक ,व नागरिक करीत आहेत.
शिवरायांच्या फक्त एका शब्दाखातर, आदिलशाही नोकरी सोडुन स्वराज्यात सामिल झालेले किल्लेदार फिरंगोजी नरसाळा शिवरायांसारखा रत्नपारखी राजा, त्यांनी ह्या अलौकिक
रत्नाला नुसते स्वराज्यात सामिलच करुन घेतले नाही तर फिरंगोजींना चाकणची किल्लेदारीपण बहाल केली. स्वराज्यात आलेले फिरंगोजी, स्वराज्याचा नेक,विश्वासू
सहकारी हि पदवी , किल्लेदारीची वस्त्रे, आणि प्रेमानी उचंबळुन, भरुन आलेला ऊर संगाती घेऊन शिवरायांकडून चाकणकडे परतले. स्वराज्यावर
एकापेक्षा एक भीषण संकटे येऊनसुद्धा फिरंगोजीनी चाकण आपल्या लेकराप्रमाणे संभाळला,अतिशय मेहेनतीने राखला, सजवला.

शहिस्तेखानाच्या बलाढ्य फौजेला चाकणचा भुईदुर्ग म्हणजे तसं अगदी मातीचं छोटसं ढेकुळ, तरीही शहिस्तेखानाच्या अवाढव्य लमाजम्याला हा एक किल्ला घ्यायला तब्बल 55 दिवस लागले.
खरं तर फार फार उमेदीने आणि प्रचंड सैन्यानिशी हा खान दख्खनेत आला होता, मात्र चाकण च्या किल्ल्याचा एक टवका उडवायला एवढा संघर्ष करावा
लागल्याने खानाच्या तोफांचा प्रचंड मारा सहन करतानाही संग्रामदुर्ग किल्ला हि खाना कडे पाहून खदाखदा हसला असेल.

संग्रामदुर्गच्या तटबुरुंजावर वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे किल्ल्याच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे.आपण किल्ल्यात कधी येतो आणि कधी बाहेर
पडतो हे कळेनासे झाले आहे.चाकण च्या भूईकोटाचे रणमंडळ हे शत्रूला अलगत ताब्यात घेणारे वेगळे वैशिष्ट्य अद्यापही पाहता येते.सुर्यमुखी दरवाजा अद्यापही
कणखर पनाची साक्ष देतो.या किल्ल्यात सापडणाऱ्या अवशेषां कडे दुर्लक्ष होते.गेल्या वीस वर्षां पूर्वी या किल्ल्याची निरनिराळ्या कारणांनी मोठी हानी झाली आहे.
या किल्ल्यात सापडलेल्या घबाडाच्या अनेक कथा आजही सांगितल्या जातात. तरीही असे का झाले? आपला इतिहास जतन करावयाच्या जाणीवा बोथट झाल्या
आहेत का असा प्रश्न दुर्ग प्रेमी विचारू लागले आहेत.

आक्रमकांविरुद्ध ज्या दुर्गानीच आपले स्वातंत्र्य आणि अस्मिता जिवंत ठेवली;त्या महाराष्ट्रातील दुर्गांची सद्यस्थिती पाहून यातना होतात.इतिहास जतन करण्याकडे
लक्षच नाही.ते असते तर दुर्गांची अशी दारूण अवस्था झालीच नसती.शिवशाहीतील एका पराक्रमाचा साक्षीदार हा चाकणचा दुर्ग आहे.
शासनाकडून भूल थापांच्या आश्वासना शिवाय या किल्ल्याला काहीच मिळाले नाही .किल्लेदार फिरांगीजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान, चाकण ग्रामपंचायतीच्या
च्या एकाकी प्रयत्नांना शासनाची असहकाराची भूमिका हरताळ फासत आहे. भीषण संकटे येऊनसुद्धा किल्लेदार फिरांगोजीने चाकण चा हा किल्ला आपल्या
लेकराप्रमाणे संभाळला, अतिशय मेहेनतीने राखला, सजवला आता त्याच्या संवर्धनाची जबाबदारी शासनाने घ्यावी अशी मागणी वारंवार होऊ लागली आहे। अविनाश दुधवडे . चाकण ९९२२४५७४७५ , ९७६५५६६९०८

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)