चाकण एमआयडीसी मध्ये मार्गची स्थापना
चाकण एमआयडीसी मध्ये मार्गची स्थापना
चाकण: अविनाश दुधवडे
चाकण एमआयडीसी मध्ये भीषण आग,वायू गळतीने होणाऱ्या संभाव्य दुर्घटना व औद्योगिक क्षेत्राशी संबंधित कारखान्यांतील आणि बाहेरील अपघातांच्या आपत्कालीन स्थितीत
म्युच्युअल एड रिस्पॉन्स ग्रुप अर्थात मार्ग हि संस्था मदतीला धावणार असून या संस्थेची स्थापना महाराष्ट्र राज्य सुरक्षा व आरोग्य विभागाचे पुणे विभागाचे सहायक संचालक
ए.बी.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण एमआयडीसीमध्ये करण्यात आली आहे.
चाकण इंडस्ट्रीज असोशिएशन चे सदस्य असणाऱ्या कारखान्यांनी मार्ग या संस्थेत सहभाग घेतला
असून सुमारे 15 लहान मोठ्या कंपन्यांचे अधिकारी या संस्थेवर प्रतिनिधीत्व करणार असून चाकण मधील सर्व कारखानदार या संस्थेचे सभासद असणार आहेत असे चाकण
इंडस्ट्रीज असोशिएशन चे सचिव दिलीप बटवाल यांनी सांगितले. चाकण एमआयडीसी मध्ये यासाठी नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये अशा संस्थेची स्थापना
करण्याचा निर्णय घेण्यात आला. चाकण मधील कारखान्यांमध्ये असणाऱ्या घातक केमिकल्सची माहिती प्रथम संकलित करण्यात येणार असून त्यानंतर एक सुविधा पुस्तिका
(ग्रीन बुक) प्रकाशित करण्यात येणार आहे. या पुस्तिके मध्ये आपत्कालीन वेळी करावयाचे संपर्क आणि या बाबतची सर्व अद्ययावत माहिती कारखान्यांच्या आणि नागरिकांच्या
सुविधेकरिता प्रकाशित करण्यात येणार आहे. कारखान्यांमध्ये अशा घटना घडू नयेत म्हणून मार्गदर्शन व उपाययोजनांसाठी ही संस्था कार्यरत राहणार असून आपत्कालीन स्थितीत
ही संस्था खुपच मदतीची ठरणार असून येत्या काही महिन्यामध्ये ही संस्था महाराष्ट्र राज्य सुरक्षा व आरोग्य विभागाचे पुणे विभागाचे सहायक संचालक ए.बी.पवार यांच्या
मार्गदर्शनाखाली कार्यरत होईल असे सीआयए चे कर्नल चतरथ यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा