निवडणूक प्रचाराचे काम नसल्याने मजूर अड्ड्यावर पुन्हा गर्दी..

*कोणता झेंडा घेऊ हाती?
चाकण:(अविनाश दुधवडे)
200 ते 300 रुपयांची दररोजची कमाई असणाऱ्या चाकण च्या तळेगाव चौकालगतचे नाका कामगारांना मिळालेला निवडणुकांच्या प्रचाराचा रोजगार आता बंद झाला आहे.
मजूर अड्ड्यावर दिवसभर काम मिळण्याची वाट बघण्यापेक्षा अनेक कामगारांनी निवडणूक प्रचार काळात हाती घेतलेले प्रचाराचे झेंडे आता मात्र प्रचाराचे वारे थंडावल्या मुळे
त्यांच्या हातातून हिसकावले गेले आहेत. त्या मुळे येथील मजूर आड्यावर दुपारी उशिरा पर्यंत गर्दी पुन्हा दिसू लागली आहे.
चाकण मधील नाका कामगारांना महापालिकांच्या निवडणुकांमध्ये येथून चांगली मागणी होती . अनेक जणांनी पिंपरी चिंचवड च्या निवडणुकांच्या प्रचारात पैसे घेऊन प्रचाराचे
झेंडे हाती घेतले होते.
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांपेक्षा महापालिकांमध्ये दारोदारी फिरत थेट प्रचाराचे तंत्र सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अवलंबिले होते . चाळी आणि बिल्डिंगमध्येही
फिरताना सोबत कार्यर्कत्यांची फौज असेल तरच उमेदवाराचा प्रभाव पडतो. पण हल्ली कार्यकतेर्ही हायटेक झाल्याने खांद्यावर झेंडा घेत दारोदारी फिरण्याची त्यांची तयारी नसते.
त्याशिवाय कामावर दांडी मारून प्रचार करण्यातही अनेकांना स्वारस्य नसते. त्यामुळे भाडोत्री कार्यकर्ते सोबत घेण्याची वेळ अनेक उमेदवारांवर आली होती .
या भाडोत्री कार्यकर्त्यांसाठी आपसूकच कार्यकर्ते मजूर अड्ड्यांकडे येतात . भोसरी नंतर चाकण येथील मजूर अड्डा प्रसिद्ध आहे. प्लंबर, रंगारी, सुतार, हेल्पर, गवंडीकाम करणारे
सकाळीच या नाक्यांवर येऊन बसतात. कामानुसार दिवसभराचा दोनशे , तीनशे ते चारशे रुपयांचा मोबदला त्यांना मिळतो. दररोज काम मिळेलच याची खात्री या कामगारांना नसते.
निवडणूक प्रचार काळात काम असतानाही मजूर मिळणे मुश्किल झाले होते. मात्र, निवडणुकांच्या हंगामात या कामगारांना सुगीचे दिवस आले होते .
एखाद्या उमेदवाराचा प्रमुख प्रचारक सकाळी नाक्यावर येऊन प्रचारासाठी कामगारांना घेऊन जात होता . त्यांच्याकेड झेंडे व निवडणूक चिन्ह खाद्यांवर घेण्यापासून पत्रके वाटण्याचे
काम सोपवले जात असे . दुपार झाल्यावर उमेदवाराच्या गाडीतून आलेल्या जेवणाच्या पाकिटांचे वाटप होते. दुपारी एकनंतर प्रचार थांबत असल्याने कामगारांना आराम मिळतो. पाचच्या
सुमारास गरमगरम चहा पोटात ढकलून पुन्हा प्रचार फेऱ्या सुरू . प्रचार संपल्यावर कामगारांच्या हातावर दोनशे ते चारशे रुपये टेकवले जात होते. उगीच हात दाखऊन
अवलक्षण नको म्हणून अशा भाडोत्री प्रचाराकांबाबत कमालीची गुप्तता पाळली जात होती . नका कामगारांनाही या बाबत काहीही न बोलण्याबात दटावले जात असे .
कमी कष्टातला रोजगार असल्याने कोणीही त्या बाबत वाच्यता करीत नव्हते मात्र मजूर अड्ड्यावरील कामगारांची संख्या मात्र त्या काळात रोडावली होती.
मात्र, आता प्रचाराची लढाई संपल्यावर ' कोणता झेंडा घेऊ हाती ' हा प्रश्न मजुरांसाठी निरुत्तरित असून पुन्हा या कामगारांची मजूर अड्ड्यावर रोजगाराची लढाई सुरू केल्याचे
नेहमीचे चित्र दिसू लागले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा