पत्नीची उमेदवारी पती दारोदारी
पत्नीची उमेदवारी पती दारोदारी
चाकण:
नवीन आरक्षणाने महिलांना मोठ्या प्रमाणावर संधी मिळाली असली तरी काही प्रवर्गातील महिला उमेदवार शोधण्यासाठी सर्वांनाच पाळता भुई थोडी झाली होती.
बऱ्याच जागा महिलांसाठी राखीव ठरल्यानंतर या भागात खुल्या व अन्य प्रवर्गातील महिला उमेदवार ही मोठ्या प्रमाणावर पुढे सरसावल्या .चाकण लगतच्या नाणेकर
वाडी ,कुरुळी ,मरकळ या पंचायत समिती गणात महिला उमेदवारांचीही संख्या वाढल्याने पत्नीला अधिकृत उमेदवारी मिळविण्यासाठी पतीराजांना दारोदारी हिंडावे लागत असल्याचे दृश्य
पहावयास मिळत आहे.अर्थात काही प्रवर्गातील आरक्षणामुळे महिला उमेदवार शोधणे सुद्धा सर्वच राजकीय पक्षांसाठी चिंतेची बाब ठरल्याचे सर्वश्रुत आहेच . राष्ट्रवादी मध्ये
पंचायत समिती साठी एका जागेवर 2 किंवा 3 महिला दावेदार आहेत. महिला आरक्षित जागेवर पत्नीची उमेदवारी असल्याने पतीराजांना अधीकृत उमेदवारी मिळविण्यासाठी
नेत्यांच्या दारोदारी हिंडावे लागत आहे. .............................अविनाश दुधवडे ,चाकण
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा