कुणी पाणी देता का पाणी ;चाकणकरांचा आक्रोश

----------------------
औद्योगीकारणाने प्रचंड विस्तारत्या चाकण शहरातील नागरिकांना एखाद्या दुष्काळी खेड्या प्रमाणे पाण्यासाठी वनवन करावी लागत आहे.गेल्या तीन दिवसांपासून
येथील नळांना पाण्याचा एक थेंबही न आल्याने अनेकांची आज (दि.28)घरात पिण्यासाठीही पाणी शिक्कल न राहिल्याने मोठी तारांबळ झाली.
गेल्या काही वर्षांपासुन चाकण चा पाण्याचा दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेला पाणी प्रश्न तूसभरही कमी झालेला नाही. चाकण ग्राम पंचायतीने
या पाणी पुरवठ्याच्या समस्येवर उपाय योजना करण्यासाठी काही भागात दिवसाआड पाणी पुरवठ्याचा उपाय योजला असला तरी नागरिकांना पाणीच मिळत नसल्याने
नागरिकांच्या रोषाचा सामना ग्रामपंचायतीला करावा लागत आहे.ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने दोन वेगवेगळ्या
जलवाहिन्यावरून आपल्या स्वतः साठी नळजोड घेतले असून सामन्यांच्या तुलनेत त्यांना पाणी टंचाईच्या झळा कमी किंवा अजिबातच बसत नसल्याने
नागरिकांच्या संयमाचा पारा आणखीच चढत असल्याची स्थिती येथे पहावयास मिळत आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी वारंवार भटकण्याची वेळ चाकणकरांवर येत आहे.
नव्या पाणी पुरवठा योजनेचे काम निधी अभावी रेंगाळले आहे. मध्यंतरी काही दिवस काही ठराविक भागात वेळेवर पाणीपुरवठा होत होता. मात्र, आता
तीन तीन दिवसांनी पाणी मिळत असल्याच्या तक्रारी सगळेच नागरिक करू लागले आहेत. येथील कूपनलिका व विहिरींचे पाणी पिण्यास योग्य नसल्याने पाण्यासाठी
वणवण भटकण्याची वेळ महिलांवर आली आहे.या शिवाय वापरासाठी पाणी विकत घेण्याची वेळ अनेकांवर आली आहे.सध्याच्या पाणी पुरवठा योजनेला नियमित
वीज पुरवठा झाल्यास एक वेळ काही प्रमाणत का होईना पाणी पुरवठा करता येऊ शकेल असे ग्रामपंचायतीचे म्हणणे असून वीज पुरवठ्यातील अनियमितता पाण्याच्या
खेळखंडोबा साठी करणी भूत असल्याचे सांगण्यात येत आहे.अचानक वीज पुरवठा सुरु झाल्याने जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचेही
चाकण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी दयानंद कोळी यांनी सांगितले.
*'टी' चे खड्डे कधी बुजणार ?-
चाकण च्या पाण्याचा प्रश्न गेल्या तीस एक वर्षांपासून कायम आहे.लोकसख्या वाढी मुळे सर्वत्र पाणी पुरवठा पूर्ण दाबाने होत नसल्याने येथील प्रत्येक घरा
बाहेर जमिनी खालून गेलेल्या जलवाहिनीला समांतर खड्डे सर्वांनीच घेतले आहेत.पाणी आले तरी या खड्ड्यातूनतून तोटीला येणारे पाणी उपसावे लागते .त्यातही
अनेक जन या खड्ड्यांतील तोट्याना मोटार बसून जलवाहिनीतून पाणी उपसण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पुढील नागरिकांना पाणीच मिळत नाही .अशा
मोटारी बसविन्यावरून वादाचे अनेक प्रसंगही येथे घडतात .आता या खड्यांमध्येच जर असे दिवसेंदिवस पाणी येणार नसेल तर हे टी चे खड्डे बुजणार कधी हा
प्रश्नच अनुत्तरीत राहत आहे.
*बारमाही टंचाई-
उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच शहरात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून अशी परिस्थिती उद्भवते. गेल्या काही वर्षांपूर्वी बंधाऱ्यात
पाणीसाठा कमी असल्यामुळे व लोकसंख्या वाढल्याने संपूर्ण शहराला एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची कार्यवाही आजही सुरू आहे. शहराच्या
आता एक वेळ पाणी मिळणेही दुरापास्त होत असल्याने सगळेचजण बेजार झाले आहेत. त्यामुळे आणखी किती काळ पाण्यासाठी संघर्ष करावा लागेल याचे उत्तर
सध्या कुठल्याही राजकीय पक्षाकडे नाही.
*25 कोटी आणायचे कोठून :
चाकण औद्योगिक वसाहत व लगतची एकोणीस गावे ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चाकण औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक आणि त्यांची संघटना
चाकण इंडस्ट्रीज असोशिएशन यांनी पूर्णत्वास आणलेल्या पाणी पुरवठा योजनेचा चाकण शहराला स्रोत गृहीत धरण्यात आला होता. चाकण डब्यू एम डी सी
भागातून चाकण ला पाणी घेऊन जावे लागणार असून त्या साठी एमजेपी ने काढलेल्या अंदाज पत्रकानुसार अंदाजे पंचवीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे
समजते.त्याच्या दहा टक्के रक्कम चाकण ग्रामपंचायतीला अदा करावी लागणार आहे.मात्र एवढे पैसे आणायचे कोठून हा प्रश्न ग्रामपंचायती समोर आहे.
या योजनेतून चाकण करांना दरडोई प्रती दिवशी सत्तर लिटर्स पाणी मिळू शकणार असून त्यासाठी प्रत्येक एक हजार लिटर्स करिता आठ रुपये मोजावे लागणार आहेत.
या योजनेची यशस्विता प्रबळ राजकीय इच्छाशक्ती वरच अवलंबून आहे.
----------------------------------------
अविनाश दुधवडे ,चाकण ९९२२४५७४७५, ९७६५५६६९०८

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा