सुरेश गोरेच चाकणचे बाजीगर
सुरेश गोरेच चाकणचे बाजीगर
*गोरेंचा वारू कुणीही रोखू शकले नाही
*कुरुळी-मरकळ मध्ये राष्ट्रवादीची सरशी
चाकण-(अविनाश दुधवडे)
नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश गोरे यांनी सात हजाराहून अधिक मताधिक्क्याने विजय मिळविल्याने खूप मोठ्या संखेने
गोरे यांच्या विरोधात एकत्र झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांना चपराक बसली आहे.विरोधी पक्षांसह स्वपक्षिय जिल्हास्तरीय नेत्यांनी आणि दस्तूर खुद्द तालुक्याच्या
लोकप्रतिनिधींनी सर्व शक्ती पणाला लावल्याची चर्चा होऊनही गोरेंनी एकहाती संपादन केलेल्या विजया मुळे या बालेकिल्ल्यात गोरेंचा वारू कुणीही रोखू शकले
नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे. गोरे यांच्या दणदणीत विजयाने आमदार मोहिते गटाला जबरदस्त धक्का बसला आहे.
राष्ट्रवादीचे सुरेश गोरे यांना 14 हजार 791 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे उमेदवार कालिदास वाडेकर यांना 7हजार 660 मते मिळाली.
गोरे यांना तब्बल 7 हजार 131 एवढे मताधिक्य मिळाले. अधिकृत पक्षाच्या उमेद्वारार्यांच्या वाटपा पासूनच खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तक्षेपामुळे
चाकण नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटाकडे संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते .आमदार दिलीप मोहिते यांनीच येथे गोरे यांना उमेदवारी देऊ नये
अशी उघड भूमिका घेतल्याने हा गट कमालीचा संवेदनशील झाला होता. आमदार मोहिते समर्थक काही उमेदवारांनी कार्यकर्त्यांनी गोरे यांचा प्रचंड वारू रोखण्यासाठी
कॉंग्रेसचे उमेदवार कालिदास वाडेकर यांना पाठींबा दिला होता. मराठा विरुद्ध माळी असे निराळेच समीकरण तयार करण्यात आले होते. प्रत्यक्षात असे जातीय समीकरण
मतदारांनी अक्षरशः धुडकावून लावल्याचे गोरे यांना मिळालेल्या मताधीक्क्यावरून स्पष्ट झाले आहे. चाकण पंचायत समिती गणातून मात्र राष्ट्रवादीचे अशोक बिरदवडे
यांचा पराभव करण्यात मतदार यशस्वी झाले अशी चर्चा या भागात होत आहे. भाजपाचे अमृत शेवकरी यांनी 853 मतांनी बिरदवडे यांचा पराभव केला . अशोक बिरदवडे यांना
5327 मते मिळाली तर अमृत शेवकरी यांनी 6180 मते मिळवीत विजयश्री खेचून आणली. नाणेकरवाडी पंचायत समिती गणात जिल्हापरिषद सदस्या म्हणून नुकत्याच कार्यकाल
पूर्ण केलेल्या राष्ट्रवादीच्या अरुणा खराबी यांना शिवसेनेच्या नवख्या उमेदवार क्रांती सोमवंशी यांच्याशी कडवी झुंज द्यावी लागली .अवघ्या 386 मतांनी त्यांनी निसटता विजय
मिळवून जिल्हा परिषदेतून पंचायत समितीतील आपला प्रवेश निश्चीत केला.अरुणा खराबी यांना 3646 मते मिळाली, क्रांती सोमवंशी यांना 3260 मते मिळाली , आमदार मोहिते
समर्थक सुजाता सातव यांनी 2684 मते आपल्या पदरात पडून घेतली तर कॉंग्रेसच्या नंदा कड यांना 1794 मते मिळाली. तुल्यबळ लढतीची अपेक्षा असणाऱ्या या गणात सर्वच
उमेदवार खराबवाडी गावच्या असल्याने गुलाल खराबवाडीतच येणार असल्याचे स्पष्ट झाले होते.
*कुरुळी -मरकळ मध्ये राष्ट्रवादीची मुसंडी :
कुरुळी मरकळ जिल्हा परिषद गटात आणि दोन्ही पंचायत समिती गणात राष्ट्वादीने जोरदार मुसंडी मारत तिन्ही जागा राखल्या .कुरुळी मरकळ जिल्हा परिषद गटात शांताराम
सोनवणे , कुरुळी गणात कल्पना गवारी ,मरकळ गणात योगिता चव्हाण विजयी झाल्या. राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारलेले भोसरीचे आमदार विलास लांडे यांचे भाचे सोमनाथ मुंगसे यांनी
या गटात सोनावणे यांच्या समोर मोठे आव्हान उभे केले होते. तरीही सोनवणे यांनीच बाजी मारली.
*येथून अध्यक्ष पदाचे क्लेम :
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) राखीव आहे. त्यामुळे अध्यक्षपदा साठी प्रमुख दावेदार समजल्या जाणार्या जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या तीन
उमेदवारांमध्ये आता जोरदार रस्सीखेच सुरू होणार आहे.
जिल्ह्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेले खेड तालुक्यातील सुरेश गोरे, इंदापूर तालुक्यातील दत्ता भरणे आणि बारामती तालुक्यातील विश्वास देवकाते हे राष्ट्रवादी
काँग्रेसचे तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.
खेड तालुक्यातील आमदार दिलीप मोहिते यांनी नाणेकरवाडी-चाकण या खुल्या गटातून ओबीसी असलेल्या सुरेश गोरे यांना उमेदवारी देण्यास विरोध
केला होता. गोरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचे असल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कदाचित गोरे यांना मिळू शकते. तसे झाल्यास गोरे यांचे
अध्यक्षपद ही आमदार गटाला आणखी मोठा धक्का ठरण्याची शक्यता आहे. म्हणूनच आमदार गटाने येथे गोरेंना थांबविण्याची राजकीय योजना आखली होती.
ओबीसीविरुद्ध मराठा अशी जुगलबंदी लावूनही गोरे यांनी विरोधी उमेदवाराचा तब्बल 7 हजार 131 इतक्या मतांनी पराभव करून आपल्या अचाट शक्तीचा जणू प्रत्ययच दिला.
नाणेकरवाडी गणातून निवडून आलेल्या अरुणा खराबी याही खेड पंचायत समितीच्या सभापती पदासाठी राजकीय योजना आखू शकतात.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा