फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा पारा वाढला
-------------
मार्चपर्यंत थंडीचा कडाका राहण्याचा हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज फोल जाण्याची शक्यता असून चाकण भागात फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा पारा वाढला आहे.
गेल्या काही दिवसांपासून एका एका अंश सेल्सिअसने तापमानाची नोंद वाढतच असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. तर रात्रीचे विशेषतः पहाटेचे
किमान तापमानकमी रहात आहे.यावर्षी पावसाने सरासरी गाठली तरी पावसात सातत्य नसल्यामुळे पिकांना त्याचा फायदा झाला नाही. पावसाळा संपल्यानंतर
नोव्हेंबरपर्यंत थंडीचा पत्ताच नव्हता. मात्र, नोव्हेंबरच्या अखेरीस सर्वत्र थंडीची लाट आली. थंडीने अनेकांना बेजारही केले होते. त्यामुळे मार्चपर्यंत थंडीची
लाट राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. मात्र, हवामान विभागाचा अंदाज खोटा ठरवत प्रत्यक्षात फेब्रुवारी संपायला आठवडा शिल्लक
असतानाच उन्हाने होरपळून काढण्यास सुरवात केली आहे. ................................
अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा