कुणी पाणी देता का पाणी ;चाकणकरांचा आक्रोश
कुणी पाणी देता का पाणी ;चाकणकरांचा आक्रोश ---------------------- औद्योगीकारणाने प्रचंड विस्तारत्या चाकण शहरातील नागरिकांना एखाद्या दुष्काळी खेड्या प्रमाणे पाण्यासाठी वनवन करावी लागत आहे.गेल्या तीन दिवसांपासून येथील नळांना पाण्याचा एक थेंबही न आल्याने अनेकांची आज (दि.28)घरात पिण्यासाठीही पाणी शिक्कल न राहिल्याने मोठी तारांबळ झाली. गेल्या काही वर्षांपासुन चाकण चा पाण्याचा दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेला पाणी प्रश्न तूसभरही कमी झालेला नाही. चाकण ग्राम पंचायतीने या पाणी पुरवठ्याच्या समस्येवर उपाय योजना करण्यासाठी काही भागात दिवसाआड पाणी पुरवठ्याचा उपाय योजला असला तरी नागरिकांना पाणीच मिळत नसल्याने नागरिकांच्या रोषाचा सामना ग्रामपंचायतीला करावा लागत आहे.ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने दोन वेगवेगळ्या जलवाहिन्यावरून आपल्या स्वतः साठी नळजोड घेतले असून सामन्यांच्या तुलनेत त्यांना पाणी टंचाईच्या झळा कमी किंवा अजिबातच बसत नसल्याने नागरिकांच्या संयमाचा पारा आणखीच चढत असल्याची स्थिती येथे पहावयास मिळत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वारंवार भटकण्याची वेळ चाकणकरांवर येत आह