सुरेश गोरे

सुरेश गोरे यांच्या उमेदवारीने खेड तालुक्यात उत्साह
Displaying suresh gore.jpg
राजगुरुनगर:  
      खेड -आळंदी  विधानसभा मतदार संघातून सुरेशभाऊ गोरे यांची उमेदवारी शिवसेनेकडून निश्चित झाल्यापासूनच सर्वसामान्य नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या जल्लोषाचे वातावरण पहावयास मिळत असून उमेदवारी अर्ज दाखल करतानाच कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांच्या उत्साहाचा मोठा प्रभाव प्रचंड गर्दीने दिसून आल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
    चाकण सह पंचक्रोशीतील विविध गावांसह पश्चिम भागातील नागरिकांनी अक्षरशः फटके उडवून आनंद व्यक्त केला आहे . शिवसेनच्या सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांनी गोरे यांच्या उमेदवारीने समाधान व्यक्त केले आहे. गेल्या काही महिन्यांपासूनच गोरे यांनी संपूर्ण विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या भेटीवर भर दिला आहे. विविध सामाजिक कार्यांच्या माध्यमातून तरुण व महिला मतदार यांना गोरे यांनी  संपर्कात ठेवले आहे. आंदोलने,मेळावेबैठका घेऊन सुरेश गोरे यांनी मतदारसंघ यापूर्वीच पिंजून काढला आहे. आपल्या अफाट लोकप्रियतेचा प्रत्यय देत उमेदवारी दाखल केल्यानंतर विविध गावांना प्रत्यक्ष भेटी देण्यावर विशेष भर दिला आहे. शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी गोरे यांच्या अफाट लोकप्रियतेच्या बळावर आणि शिवसेनेच्या गावागावातील संघटनाच्या बळावर आजवरच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेचा उमेदवार कुठल्याही परिस्थितीत निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. गोरे यांच्या प्रचार यंत्रणेच्या बरोबरीनेच शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांपासून तालुकाप्रमुखशहरप्रमुखविभाग प्रमुख व सर्व शिवसैनिक यांनी आपापल्या विभागात प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. परिसरातील सर्वच गावांतील सर्वसामान्य नागरिकांमध्येही सुरेश गोरे यांच्या उमेदवारीच्या घोषणेपासूनच विजयाची चर्चा रंगू लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)