दोन तरसे पडली विहिरीत

भक्ष्याच्या शोधात भरकटलेली दोन तरसे पडली विहिरीत
एका तरसाचा मृत्यू  ;  आंबोली येथील घटना
Displaying tarsala vachvitana van vibhagache karmchari.jpg
आंबोली (ता.खेड) येथील विहिरीत पडलेल्या तरसला वाचविताना वनविभागाचे कर्मचारी व नागरिक 


आंबोली :  
भक्ष्याच्या शोधात भटकत असलेले दोन तरस विहिरीत पडल्याची घटना आंबोली (ता.खेड,जि.पुणे) येथे घडली असून  पाण्याने भरलेल्या विहिरीत पडलेल्या दोन तरसांपैकी एका तरसाला वाचवण्यात यश आले तरएका तरसाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हि दुर्दैवी घटना आज (दि.१२)  सकाळच्या सुमारास घडली. 
 या बाबतचे वृत्त असे कि रात्रीच्या अंधारात  भक्ष्याच्या शोधात भरकटलेले  दोन तरस हे प्राणी आंबोली ( ता खेड ) येथे गावालगत असलेल्या धर्मा शिंदे यांच्या विहिरीत पडली होती. ज्या विहिरीत ही तरसे पडलेली होतीती विहीर पाण्याने तुडुंब भरलेली होती . या तरसांनी विहिरीच्या बाहेर येण्याचा खूप प्रयत्न केलापरंतु पाण्याच्या पातळीपासून विहिरीचा कठडा उंच असल्यामुळे या तरसांना वर चढता आले नाही.  वर चढण्याच्या प्रयत्नात एक तरस जखमी झाले होते. शेवटी पाण्यात पोहून पोहून थकल्यामुळे हि तरसे विहिरीत असणाऱ्या दगडांच्या आधाराला पकडून बसली होती. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यावर ग्रामस्थांनी या घटनेची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात दिली. विहिरीत पडलेल्या तरसांना पाण्याबाहेर सुरक्षित काढण्यासाठी आंबोली गावचे रहिवासी असलेले पंचायत समितीचे सभापती सुरेश शिंदे यांनी माजी पं स सदस्या सुगंधा शिंदेवनकर्मचारी ए एन बोरावडेव्ही पी कदमढोरेवनमजूर भरत रौंधळ तसेच शिवाजी शिंदे,  खंडागळेअशोक कोकणेधर्मा शिंदेजीजाराम कोकणे व ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत एक पलंग सोडला. या पलंगावर एक तरस बसले व त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. बाहेर येताच या तरसाने क्षणाचाही विलंब न करता थेट जंगलात धूम ठोकली. त्यानंतर विहिरीतील दुसऱ्या तरसाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पोहून पोहून थकल्यामुळे जखमी झालेल्या तरसाला पलंगावर चढता आले नाहीते पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले व बुडून मरण पावले. खेड तालुक्याच्या दुर्गम पश्चिम भागात असलेले आंबोली हे गाव पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेले असून या भागात तुलनेने जंगलक्षेत्र चांगल्या प्रमाणात आढळून येते. तसेच या गावापासून भीमाशंकर अभयारण्य अगदी हाकेच्या अंतरावर असल्यामुळे या परिसरात वन्यजीवांचे अस्तित्व मोठया प्रमाणात आहे. 
---------


अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५ 
Avinash Dudhawade,chakan 9922457475 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)