नवनिर्वाचित नूतन आमदार सुरेशभाऊ गोरे यांचा परिचय

Displaying suresh gore (1).jpg
नवनिर्वाचित नूतन आमदार सुरेशभाऊ गोरे यांचा परिचय
चाकण: 
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या शब्द बारामतीप्रमाणेच एकमेव खेड तालुक्याने कधीही पडू दिला नाही . त्यामुळे येथे नेहमीच पवारांच्या विचारांचा आमदार निवडून गेल्याचा मागील अनेक वर्षांचा इतिहास आणि तालुक्यातील त्यांची मक्तेदारी शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी मोडीत काढली. आणि त्यांनी १ लाख ३ हजार २०७ मतांसह राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते यांच्यावर ३२ हजार ७१८ मतांची आघाडी घेत मोठा विजय संपादन केला. त्यामुळे आपणच खेड तालुक्याचे बाजीगर असल्याचे गोरे यांनी दाखवून दिले आहे. नवनिर्वाचित नूतन आमदार सुरेश नामदेव गोरे यांचा जन्म २७ डिसेंबर १९६३ ला चाकण येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण चाकणच्या शिवाजी विद्यामंदिरात पूर्ण झाले. त्यांनी बी.कॉम ची पदवी पुण्याच्या वाडिया महाविद्यालयातून घेतली असूनपुण्याच्याच सिंबॉयसिस येथून डी.टी.एल. (डिप्लोमा इन टॅक्सेशन लाॅ) व डी.बी.एम पदवी संपादन केली आहे. १९९८ साली त्यांची सर्वात प्रथम चाकण विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर संचालक व अध्यक्ष म्हणूनही निवड झाली. २००२ मध्ये सर्वात प्रथम ते राष्ट्रवादीकडून पुणे जिल्हा परिषदेवर चाकण कुरुळी या तत्कालीन  गटातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. २००५ मध्ये त्यांची पुणे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली. त्यानंतर पुन्हा एकदा २०१२ मध्ये त्यांची राष्ट्रवादीकडूनच पुणे जिल्हा परिषदेवर १४ हजार ७९१ इतक्या मोठ्या मताधिक्क्याने निवड झाली. २००२ साली स्वर्गीय गुलाबराव गोरे प्रतिष्ठान संचालित मराठी व इंग्रजी माध्यमाची मोठी शिक्षण संस्थाही त्यांनी चाकण येथे सुरु केली आहे. राजकीय जीवनात प्रवेश केल्या नंतर त्यांनी समाजसेवेसाठी पूर्ण वेळ देण्यास प्रारंभ केला. सर्वाना आपलेसे करून विश्वासात घेवून निरुपद्रवी राजकारण करण्याचा त्यांचा स्वभाव तालुक्याला परिचित आहे.  त्यांच्या पत्नी मनीषा गोरे या गृहिणी आहेत. वडील दिवंगत नामदेवशेठ गोरे हे मार्केट असोशिएशनचे अध्यक्ष होते. चुलते व तालुक्यातील जेष्ठ दिवंगत नेते गुलाबराव गोरे हे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सलग १५ वर्षे संचालक होते. त्यांनी स्थापन केलेली चाकण ग्रामीण पतसंस्था चाकण मधील सर्वात अग्रणी संस्था आहे. त्यांचे चुलते बाळासाहेब गोरे हे सुद्धा खेड बाजार समितीचे विद्यमान संचालक आहेत. आई जानकाबाई गोरे या गृहिणी आहेत. नूतन आमदार सुरेशभाऊ गोरे यांचा मोठा परिवार असून आजही संपूर्ण कुटुंब एकत्रित कुटुंब पद्धतीचा पुरस्कर्ते असून सगळे कुटुंब एकसंध आहे. सुरेश गोरे यांचा कांदा बटाटा व्यापाराचा वडिलोपार्जित मोठा व्यवसाय असून बांधकाम व्यवसायातही या कुटुंबाचा मोठा लौकिक आहे. 
-----------------
अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)