शिवसेनेची स्वबळावर सत्ता येईल ; उद्धव ठाकरे

राज्यात शिवसेनेची स्वबळावर सत्ता येईल उद्धव ठाकरे 
Displaying chakan udhav thakre sabha.jpg
चाकण (ता.खेड,जि.पुणे) येथील मार्केट यार्डाच्या भव्य प्रांगणात प्रचंड जनसमुदाया समोर बोलताना उद्धव ठाकरे  (छायाचित्र :अविनाश दुधवडे,चाकण)
शिवसेनेची चाकणला विराट सभा

चाकण:
  शहेन शहा असो की बाद शहादिल्लीपुढे मान झुकविणार नाही हा शिवरायांचा बाणामहाराष्ट्र झुकेल तो फक्त शिवराय जिजाऊ आणि जनते समोर  केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असावे हे बोलण्यासाठी ठीक आहे.  दिल्ली हमारीराज्यातही आम्हीच. अरे तुमचा मुख्यमंत्री कोण?कोण आहे तुमच्याकडे चेहरा दिल्लीकडे बघून शेपूट हलविणारा मुख्यमंत्री तुम्हाला हवा आहे का असा परखड सवाल उपस्थित करीत राज्यात स्वबळावर शिवसेनेची सत्ता येईल असा विश्वास  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चाकण येथे विराट जाहीर सभेत व्यक्त केला.
    खेड- आळंदी विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार सुरेशभाऊ गोरे यांच्या प्रचारार्थ चाकण (ता.खेड,जि.पुणे) येथील मार्केट यार्डाच्या भव्य प्रांगणात आज (दि.९ ) आयोजित विशाल जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह कॉंग्रेस ,राष्ट्रवादी आणि भाजपाच्या  सर्वच नेत्यांवर टीकास्त्र सोडले व  दिल्लीत आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असावेया भाजप विचाराची’ त्यांनी जबरदस्त खिल्ली उडविली.  पुढे बोलताना ते म्हणाले कि,दोन्ही ठिकाणी एकाच पक्षाचे सरकार असावेहा विचार बोलण्यासाठी ठीक आहे. देशभरात मोदी लाटेची भरती आली होती आम्हीही लोकसभा निवडणुकीत मोदींसाठी मते मागितली होती याचा त्यांना आता विसर पडला आहे . महाराष्ट्राचे तुकडे पाडण्यासाठी दुष्ट मनसुबे रचले जात आहेत  शिवसेनेची राज्यात सत्ता आल्यानंतर अखंड महाराष्ट्र ठेवूनच विदर्भाचा विकास केला जाईल. महाराष्ट्राचे तुकडे पडणार नाहीत असे पंतप्रधान सांगतात लगेच त्यांचेच नेते वेगळ्या विदर्भाची घोषणा करतात. मात्र कुठल्याही स्थितीत महाराष्ट्राचे तुकडे पडू न देता शिवसेनेची एक हाती सत्ता आणून राज्याचा विकास करू शिवरायांनी घडवलेलाजोजवलेला अखंड महाराष्ट्र तोडण्याचे कपटकारस्थान सुरू आहे. स्वराज्यावर चालून येणार्‍या,शिवरायांच्या महाराष्ट्राचे तुकडे पाडायला निघालेल्या शत्रूंशी संघर्ष झाला तरी बेहत्तरपण शिवसेना महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाहीअसा जबरदस्त एल्गार उद्धव ठाकरे यांनी  व्यक्त करताच 'कोण आला रे कोण आला .. शिवसेनेचा वाघ आला' ...  ‘जय भवानीजय शिवाजीचा प्रचंड गजर चाकण मध्ये विराट सभास्थळी घुमला.  मुंडे - महाजन कुटुंबांशी आमचे नाते टिकून आहे. त्यामुळेच पंकजाप्रीतम यांच्या पाठीशी भाऊ म्हणून मी खंबीर उभा आहे. या बहिणींच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार दिला नाही. पंकजाप्रीतम निवडून आल्याच पाहिजेतपण आजूबाजूला धनुष्यबाण चालला पाहिजेअसेही उद्धव ठाकरे म्हणाले.  खासदार शिवाजीराव आढळराव यांनी खेडच्या विद्यमान आमदारांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला व खेड तालुक्यातील दहशत वाद संपविण्यासाठी सामन्यांचा चेहरा असलेल्या गोरे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. उमेदवार सुरेशभाऊ गोरे यांनी यावेळी खेड तालुक्यात परिवर्तन घडणार असून तालुक्यातील सगळी जेष्ठ व तरुण मंडळी आणि तमाम जनता येथील दहशतवादाला संपविणार आहे. जनतेने कौल दिल्यानंतर त्याचा जनतेला माझ्याकडून कदापीही त्रास होणार नाहीलोकांच्या विकासाची कामे होतील आणि चुकूनही पैशांची लालसा ठेवणार नाही असे उमेदवार गोरे यांनी सांगताच तमाम जनतेने गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.  यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख खासदार गजानन किर्तीकर खासदार शिवाजीराव आढळराव,  यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडेखेड पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेश जवळेकरराजगुरुनगरचे माजी सरपंच अतुल देशमुखपंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूरउपजिल्हाप्रमख शिवाजी वर्पेतालुकाप्रमुख अॅड.गणेश सांडभोरविजया शिंदेयुवा सेनेच्या अॅड. अमृता गुरव ,प्रकाश वाडेकरमाजी तालुकाप्रमुख सुरेश चव्हाणप्रीतम शिंदेपांडुरंग गोरेअजित बुट्टेचंदन मुऱ्हे,काळूराम गोरेरामदास जाधवदत्ता कंदशेखर पिंगळेयांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. प्रकाश वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले तर तालुकाप्रमुख अॅड.गणेश सांडभोर यांनी आभार मानले.

रामदास ठाकूर यांच्यासह अनेकांचे  सेनेत प्रवेश :
 खेड पंचायत समिती व बाजार समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर यांनी आपल्या तमाम समर्थक कार्यकर्त्यांसह यावेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने सुरेशभाऊ गोरे यांचे मताधिक्य आणखी वाढणार असल्याची चर्चा या जाहीर सभेत जमलेल्या नागरिकांमध्ये होत होती. खराबवाडीच्या उपसरपंच व तालुका कॉंग्रेसच्या महिलाध्यक्षा नंदाताई कड,मनसेचे योगेश आगरकरव विविध गावाचे सरपंच उपसरपंच यांनी यावेळी सेनेत प्रवेश केले.  तर खुद्द उद्धव ठाकरे यांनी राजेश जवळेकरअतुल देशमुख, रामदास ठाकूर , रामशेठ गावडे यांच्यासह अनेकांनी  तालुक्यात परिवर्तन घडविण्यासाठी घेतलेल्या एकत्रित भूमिकेचे यावेळी जोरदार स्वागत केले. या सभेला तालुक्याच्या सर्वच भागातून मोठ्या प्रमाणावर आलेल्या विराट जनसागराने आणि परिवर्तन घडणारच असल्याचा विश्वास अनेकांनी यावेळी व्यक्त केला. 

 -----------------
अविनाश दुधवडे ,चाकण 
Avinash Dudhawade chakan 9922457475 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)