खेड तालुक्यात दिवाळीचा अनोखा पायंडा
खेड तालुक्यात दिवाळीचा अनोखा पायंडा
खेड तालुक्यातील नागरिकांनी नवनिर्वाचित आमदारां समवेत अशी अनोखी दिवाळी साजरी केली. (छाया: अविनाश दुधवडे,चाकण) |
नवनिर्वाचित आमदारांचा उपक्रम
चाकण:
संपूर्ण खेड तालुक्यातील नागरिकांसोबत दिवाळी साजरी करण्याचा अनोखा पायंडा खेडचे नवनिर्वाचित आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी सुरु केला असून दिवाळी निमित्त खेड तालुक्याच्या विविध गावातील नागरिकांशी संवाद साधून विविध प्रलंबित प्रश्नांबाबत नागरिकांचा आत्मविश्वास उंचावण्याचा प्रयत्न केला. या पुढे खेड तालुक्याचा आमदार हा जनसेवक बनून तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबतच राहणार आहे,असा संदेश त्यांनी या निमित्त तालुक्यातील जनतेला दिला.
दिवाळीनिमित्त चाकण येथे ‘दिवाळी फराळ’ कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी सात वाजले पासून रात्री अकरा वाजेपर्यंत आमदार गोरे यांनी विविध गावांतून गटागटाने आलेल्या सुमारे पंचवीस ते तीस हजार नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी अनेक गावातील प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्नही आमदार गोरे यांनी केला. या कार्यक्रमास खुद्द खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे, जेष्ठ नेते नानासाहेब टाकळकर, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर, माजी उपसभापती राजुशेठ जवळेकर , राजगुरुनगरचे माजी सरपंच अतुल देशमुख , खेड तालुका शिवसेना प्रमुख अॅड. गणेश सांडभोर , जिल्हा संघटक विजयाताई शिंदे ,युवासेनेच्या जिल्हा प्रमुख अॅड. अमृता गुरव , शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव वर्पे , पोपटराव तांबे, प्रकाश वाडेकर , लक्ष्मण जाधव, रामदास जाधव , चाकणचे माजी सरपंच नंदकुमार गोरे, काळूराम गोरे , माजी उपसरपंच साजिद सिकीलकर, अस्लमभाई सिकीलकर,समीर सिकीलकर, जहीर शेख , सुरेश चव्हाण, प्रीतम शिंदे, नंदाताई कड, काळूराम कड, रोहिदास तापकीर, रमेश गोगावले, सुभाष मांडेकर, पांडुरंग गोरे, तालुका कॉंग्रेसचे विजय डोळस, अनिल (बंडू) सोनवणे, भाजपाचे लक्ष्मण टोपे, अमित टाकळकर , रिपाईचे संतोष जाधव, अशोक गोतारणे, राहुल गोतारणे, नितीन जगताप, राजगुरुनगर बँकेचे संचालक अशोक भुजबळ, विजयसिंह शिंदे , चंदन मुऱ्हे , बाजारसमितीचे संचालक बाळासाहेब गोरे, चाकण पतसंस्थेचे अध्यक्ष नवनाथ शेवकरी, माजी अध्यक्ष नितीन गोरे, सुरेश कांडगे, उद्योजक राजेंद्र गोरे, बिपीन रासकर ,अभिमन्यू शेलार , दत्तात्रेय गोरे,विकास गोरे,अरुण शेवकरी, प्रकाश भुजबळ ,अशोक जाधव, आदींसह विविध गावाचे सरपंच ,उपसरपंच , विविध कार्यकारी संस्थांचे अध्यक्ष- उपाध्यक्ष, विविध संस्थांचे पदाधिकारी त्याच प्रमाणे सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते. खेड तालुक्यातील राजगुरुनगर पासून आळंदी ते तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागातील जवळपास सर्व गावातील नागरिकांनी दिवसभर येथे तोबा गर्दी केली होतीच मात्र यात तालुक्याच्या विविध भागातून आलेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती.
------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा