चाकण मध्ये पोलीस व बीएसएफचे सशस्त्र संचलन
चाकण मध्ये पोलीस व बीएसएफचे सशस्त्र संचलन
चाकण (ता.खेड) येथे पोलीस व बीएसएफचे जवान यांनी सशस्त्र संचलन केले (छायाचित्र :अविनाश दुधवडे,चाकण) |
चाकण:वार्ताहर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणेसह जिल्हा ,तालुका प्रशासन व पोलीस प्रशासन नियोजनात व्यस्त आहे. पोलीस प्रशासनाने पुणे ग्रामीण पोलीस व सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान आणि अधिकाऱ्यांची मदत घेत आहे. निवडणुकीच्या कालावधीत कुठेही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मनोज लोहिया,अप्पर अधीक्षक विजय मगर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय कुमार पाटील यांच्या आदेशाने चाकण भागात आज (दि.१३) पोलीस तुकडय़ांचे सशस्त्र संचलन करण्यात आले. चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी.बी.पाटील व बीएसएफचे लेफ्टनंट कमांडन्ट दीपक कुमार यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चाकण शहरात बंदोबस्त वाढविला असून सर्वत्र रूटमार्च काढण्यात येत आहे. प्रत्येक विभागातून शिस्तबद्ध संचलन सुरू आहे. विधानसभा निवडणूक शांततेमध्ये पार पाडण्यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांत अनेकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. या भागात येणाऱ्या काळ्या पैशांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. नाकाबंदी वाढविण्यात आली आहे. निवडणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी पूर्ण शहरात ‘रूट मार्च’ केल्याचे पोलीस निरीक्षक डी.बी.पाटील यांनी सांगितले. सशस्त्र पोलीस, बीएसएफ दलाच्या तुकडी या भागात पाचारण करण्यात आल्या असून पुणे ग्रामीण च्या पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
------------
अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा