डी टी एल कंपनीला भीषण आग

चाकण येथील डी टी एल कंपनीला भीषण आग 
सहा कोटींच्या नुकसानीचा अंदाज
दोन तासांनी आग आटोक्यात
जीवितहानी नाही  
Displaying 20140920_164406.jpg
खराबवाडी येथील डी  टी एल कंपनीला लागलेली आग  विझवताना फायर ब्रिगेडचे कर्मचारी 

चाकण :
खराबवाडी  ता. खेड गावच्या हद्दीतील पॉवर हाउस मागे असलेल्या  डी टी एल अॅन्सीलरिज लि. कंपनीतील पेंट शॉपला  आज ( दि. २० ) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शाॅर्ट सर्किटमुळे आग लागून सुमारे सहा कोटी रुपयांचे नुकसान झाले. तब्बल दोन तासांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले मात्र तो पर्यंत कंपनीतील दोन पेंट बूथ व कच्चा पक्का माल संपूर्ण पणे आगीत भस्मसात झाला होता सुदैवाने  या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही .
     आज (दि.२० ) दुपारी तीन वाजनेचे सुमारास   डी टी एल अन्सिलरिज लि . या कंपनीच्या पेंट शॉपला आग लागल्याचे सुरक्षारक्षक व कामगारांच्या  लक्षात आले. तत्काळ कंपनीचे अधिकारी व मालकांना या बाबतची माहिती देण्यात आली. आगीचा फैलाव व लगतच्या कारखान्यांना होणारा संभाव्य धोका याचे  गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी तासाभरात अग्निशामक दलाचे  सुरुवातीला एक व नंतर तीन  असे चार अग्निबंब आणि चार पाण्याचे  टँकर तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. मात्र अवघ्या काही वेळात आगीने रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण कारखाना आगीने वेढला गेला. अग्निशामक दलाचे चाकण एम आय डी सी बजाज आटो व्होक्स वॅगन  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यांचे चार  अग्निबंब व ३०  अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. मात्र कंपनीत मोठ्या प्रमाणात असलेल्या पेंटला लागलेली हि आग आटोक्यात आणण्यात दोन तासांहून अधिक वेळ लागला . व आग असलेल्या ठिकाणी फॉम व पाणी यांचा मोठ्या प्रमाणावर मारा करण्यात आला. चाकण पोलीस घटनास्थळावर लक्ष ठेऊन होते . आजूबाजूच्या नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली होती. 
   सायंकाळी साडेपाच  नंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलाच्या जवानां यश आल्यानंतर सर्वानीच सुटकेचा निश्वास सोडला. मात्र धूपनाऱ्या पेंटच्या  धुराचे लोळ उशिरा पर्यंत निघत होते.  कारखान्याचा संपूर्ण पेंट शॉप पेंट बूथ तयार पक्का व कच्चा माल,यंत्रसामुग्रीव कंपनीचे संपूर्ण शेड या दुर्दैवी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले . दुपारी दुसरी  पाळी सुरु होण्यापूर्वी हि आग लागली आग लागल्याचे लक्षात येताच कामगारांना बाहेर काढण्यात आले  त्यामुळे मोठा अनर्थ टाळला असल्याचे चाकण पोलिसांनी सांगितले. मंडलाधिकारी राजाराम मोराळे यांनी या घटनेची माहिती प्रांताधिकारी हिम्मतराव खराडे व  तहसीलदार  प्रशांत आवटे यांना दिली असून गावकामगार तलाठी ए.एन.सुतार व पोलिसांनी रात्री उशिरा पर्यंत  घटनास्थळावर पंचनामा सुरु केला असून पुढील तपास सुरु आहे. विजय मोहन जैन व सिद्धार्थ विजय जैन  यांच्या मालकीचीहि कंपनी असून येथे वाहनांचे हौदे (लोड बॉडी) बनविण्याचे काम चालते. दुपारी अचानक शाॅर्ट सर्किटमुळे आग लागून हा प्रकार झाल्याचे कंपनीच्या अधिकार्यांनी सांगितले.
----------------------------------------------------------
अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)