राज्यात सत्ता बदल नक्की ; पंकजा मुंडे -पालवे

राज्यात सत्ता बदल नक्की ;  पंकजा मुंडे -पालवे
Displaying sangharsh yatra. 2 jpg.jpg
चाकण( ता.खेड) येथे मार्गदर्शन करताना पंकजा मुंडे -पालवे  ( छाया:अविनाश दुधवडे)
चाकण:
भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी १९९५ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीअगोदर राज्यात काढलेल्या संघर्ष यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि त्यावेळी शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले होते   त्यांच्याच पावलावर पाउल टाकून आपण संघर्ष यात्रा काढली असून त्याचा फायदा महायुतीला नक्की होईल आणि विधानसभा निवडणुकीत नक्की सत्ताबदल होईल असा ठाम विश्वास  आमदार पंकजा मुंडे-पालवे  यांनी  चाकण( ता.खेड) येथे व्यक्त केले.  चाकण येथे आज ( दि.१३) पंकजा पालवे-मुंडे यांनी राज्यात सुरू केलेल्या संघर्ष यात्रा आली होती , त्यावेळी त्या बोलत होत्या . भाजपच्या कार्यकर्त्यांनी अचानक आयोजित केलेल्या या कार्यक्रमासही भाजपच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी भाजपाचे आमदार संजय (बाळा) भेगडे , संदीप सोमवंशी,रामदास मेदनकर, लक्ष्मण टोपे, क्रांती सोमवंशी, पप्पू टोपे , राजन परदेशी , आदींसह कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.  उत्तर पुणे जिल्ह्यातील या  संघर्ष यात्रेचे चाकण मध्ये सायंकाळी सात वाजता  आगमन झाले होते.
----------------
 अविनाश दुधवडे,चाकण 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वैदू समाजातील महिलांच्या पारंपारिक व्यवसायाला घरघर