दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाचा निषेध!!!

दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाचा निषेध!!!
विविध संघटनांकडून आंदोलनाचा इशारा....
चाकण: 
अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात जवखेडे खालसा गावामध्ये दलित कुटूंबातील युवक व त्याचे आई-वडील अशा तिघांची निर्घूणपणे हत्या करण्यात आली. या तिहेरी दलित हत्याकांडाचा चाकण सह तालुक्यातील दलित संघटनांनी तीव्र निषेध केला असून राज्यात दलित समाज दहशतीत वावरत असून पोलिसांनी आरोपींना अटक करुन जाधव कुटूंबियांना न्याय प्रदान करावा, अशी जोरदार मागणी केली आहे. 
नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील जाधव कुटुंबीयांच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव जाधव, तालुकाध्यक्ष संतोष जाधव, शहराध्यक्ष अशोक गोतारणे, राहुल गोतारणे, सतीश आगळे, नितीन जगताप, अक्षय घोगरे, अभिजित घोगरे, महेंद्र दुधवडे , यांनी या संदर्भात राज्यभरातील विभागीय आयुक्त कार्यालयांकडे निवेदन देणार असल्याचे स्पष्ट केले असून  या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभा संघटनेतर्फेही तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून तालुकाध्यक्ष लक्ष्मण दुधवडे
(गुरुजी)  ,कोषाध्यक्ष सिद्धार्थ (बाप्पू) गोतारणे, जिल्हा संघटक पी के. पवार, राजेंद्र भोसले, आर.डी.गायकवाड, विशाल गायकवाड, निखिल नवरे, विजय भवार, किरण तुळवे ,भारिपचे प्रकाश डोंगरे , लक्ष्मण मोरे, आदींनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. भीमशक्ती संघटना व तालुका कॉंग्रेस पक्षाच्या वतीने अध्यक्ष विजय डोळस यांनी नगर हत्याकांडाचा निषेध केला असून तिहेरी हत्याकांडाने राज्यात दलित समाज दहशतीत वावरत असून पोलिसांनी आरोपींना अटक करुन जाधव कुटूंबियांना न्याय प्रदान करावा, अशी मागणी करीत मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक न केल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे .
 -------------------------------------------------
अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वैदू समाजातील महिलांच्या पारंपारिक व्यवसायाला घरघर