तालुक्यातील समस्यांच्या वावटळीला दिवा लावण्याचे दिव्य

तालुक्यातील समस्यांच्या वावटळीला दिवा लावण्याचे दिव्य
नवनिर्वाचित आमदार गोरेंच्या समोर अनेक आव्हाने

Displaying suresh gore (1).jpgचाकण: 

    खेड तालुक्यातील प्रचंड टोकाची विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी एकदाची संपली आहे. तालुक्यातील तमाम जनतेने पहिल्यांदाच सुरेशभाऊ गोरे यांच्या रूपाने एकूण मतदानाच्या ५२ टक्क्यापेक्षा अधिक मते म्हणजे तब्बल १ लाख ३ हजार २०७ मते पदरात टाकीत शिवसेनेला संधी दिली आहे. सामान्यांना हवा असणारा आश्वासक विकास व भयमुक्त तालुका या सुरेशभाऊ गोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आवाहनाला तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील जनतेने जबरदस्त प्रतिसाद दिला. नवनिर्वाचित आमदार सुरेशभाऊ गोरे यांना दोनदा जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून असलेला अनुभव दांडगा यामुळे तालुक्यातील समस्यांशी ते अवगत आहेत . मात्र तरीही तालुक्याच्या संपूर्ण गावागावाची व संबंधित नागरिकांना अपेक्षित कामकाजाची माहिती होण्यास काही कालावधी नक्कीच लागणार आहे 
   खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावे विकासाच्या बाबतीत कोसो दुर आहे. तालुक्यातील अनेक गावांना विकासाच्या वाटेवर चालण्यासही अजुन बराच काळ लागेल ही वस्तुस्थिती आहे.  संपूर्ण विकास होणे हा लांबचा पल्ला आहे. तालुक्याच्या सर्वच भागातील नागरिकांना सध्या गरज आहे ती निर्भय वातावरणपुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न एमआयडीसीतकायम स्वरूपी रोजगारटिकाऊ रस्तेपुरेसे स्वच्छ पाणीस्वच्छता व लोकाभिमुख सेवेची.  या प्राथमिक गरजा सुरुवातीच्या काळात पुरविण्यास जरी नवनिर्वाचित आमदार सुरेशभाऊ गोरे यशस्वी ठरले तरी जनतेच्या दृष्टीने तो विकासच ठरेल. गेल्या काही वर्षाच्या कार्यकाळात सत्तेवर असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थापासून विविध पदांवर असलेल्या निगरगट्ट प्रतिनिधींमुळे विकासा बाबत अनेक गावांना विश्वासच राहिला नाही. खेड तालुक्यातील विविध गावांच्या वाड्या- वस्त्यांच्या आणि चाकण -राजगुरुनगर -आळंदी आदी शहरांच्या असंख्य समस्यांच्या वावटळीला दिवा लावण्याचे दिव्य नवनिर्वाचित आमदार सुरेशभाऊ गोरे यांना पूर्ण करावे लागणार आहे.

पुनर्वसनाचे प्रश्न  :
खेड तालुक्यात चासकमान,कळमोडी आणि भामा आसखेड ही तीन धरणे बांधून पूर्ण झाली.  खेड तालुक्यात झालेल्या तिन्ही धरणांच्या पुनर्वसनाच्या अनुभवावरून नागरिकांमध्ये प्रकल्प ग्रस्तांमध्ये असंतोष आहे. केवळ मतांच्या राजकारणासाठी काहींनी हा मुद्दा केला असला तरी त्यांच्या वेदना पुढील काळात समजून घेवून शासन स्तरावर त्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.त्यातच आश्चर्याची बाब म्हणजे पाणी असूनही त्याचे नियोजन नसल्याने आणि येथील पाण्याची पळवापळवी सुरु असल्याने आज पाण्यासाठी भूमिपुत्रांना वणवण फिरावे लागते. राजगुरुनगर ,आळंदी आणि चाकण शहरांना आजही पुरेसा आणि स्वच्छ पाणी पुरवठा होत नाही  आजपर्यंत राजकीय द्वेषाने याकडे सपशेल दुर्लक्ष झाले असून ही स्थिती बदलण्याचे आव्हान आहे.

भूमिपुत्रांना रोजगार :
खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कारखानदारी येवूनही भूमिपुत्र बेरोजगार युवकांना रोजगार मिळाला नाही तेथे केवळ ठेकेदारीचे स्तोम माजले आहे. खेड तालुक्यातील भूमिपुत्रांना येथे कायम स्वरूपी रोजगार देताना दुजाभाव ठेवला जातो. त्यामुळे आता आता सकारात्मक मार्गाने  स्थानिकांच्या रोजगारासाठी लढा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.

रोजगाराभिमुख शिक्षण :
 ग्रामीण भागात मूलभूत सुविधांची वाणवा  आहे. योजना अनेक आहेतपरंतु त्या तळापर्यंत पोचतच नाहीत. तरुणांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण गावाच्या जवळच्या  ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे.  तालुक्यातील जनतेसाठी चांगल्या शिक्षणाची कक्षा आणखी प्रचंड विस्तारण्याचा प्रयत्न होण्याचे आव्हान आहे.

ग्रामीण-दुर्गम भागाचा चेहरा बदलण्याची गरज  :
 अन्नवस्त्रनिवारा या मूलभूत गरजांसोबतच शुद्ध पाणीस्वच्छताआरोग्यपोटभर अन्न,दळणवळणाची साधनेअंधारलेल्या अनेक जीवनात प्रगतीचा उजेड हवा आहे. मात्रग्रामीण जनता यांपासून वंचित असल्याचे आजही दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.  हा चेहरा बदलण्यात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आजवर दिसत होता. शेतीवर आधारित उद्योगांना प्राधान्य देण्यात आले नाही.  तालुक्याच्या पश्चीम व पूर्व भागात आरोग्यरस्ते,वीज आणि रोजगार या बाबींना अधिकाधिक महत्व देण्याची गरज आहे.

आरोग्य सुविधा देण्याचे आव्हान :
समाजातील गरीब व वयोवृद्ध रुग्णांना खासगीत न परवडणाऱ्या तपासण्या प्राथमिक आरोग्य केंद्रात झाल्या पाहिजेत.  मात्र त्यासाठीची अत्याधुनिक यंत्रणा नसल्याने तपासण्या होत नाहीत. आरोग्य केंद्रात २४ तास वैद्यकीय अधिकारी असावेत. औषधांचा योग्य साठा उपलब्ध असावा यासाठी प्रयत्न करून तालुक्याच्या पश्चीम भागासाठी आरोग्य सुविधा देण्याचा विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.

राजगुरूनगर-चाकण आळंदी शहरांना सुविधा  :
   आळंदी ,चाकण,राजगुरुनगर मधील वाहतूक कोंडी गंभीर अपघातशासकीय रुग्णालयांची अवस्थागुन्हेगारीचा चढता आलेखरस्ते,वीजशुद्ध पाणीआणि सर्वच प्रकल्प ग्रस्तांना मदतीचा हात,  आदी बाबी येथील जनतेच्या जिव्हाळ्याच्या आहेत. प्रत्यक्षात प्रचंड लोक्संखेने विस्तारत्या या शहरांच्या नियोजनबद्ध विकासाला वाटण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीचे अधिकार काढून घेण्यात आल्याने बांधकाम नोंदीचा प्रश्न प्रलंबित पडला असून ग्रामपंचायतींच्या उत्पन्नाला खड्डा पडला असून सामान्यांना हक्काची घरे बांधणे अडचणीचे झाले आहे. यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे.

समन्वयातूनच विकास  :
 ग्रामीण-दुर्गम भागात शेतीलाप्यायला पाणी नाही. शाळा आहेपरंतु जागतिक स्पर्धेत टिकेल अशी पिढी तयार होण्यासाठी लागणाऱ्या शिक्षणाच्या सोयी नाहीतआरोग्याची सुविधा नाही,रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. योजना फार आहेतमात्र त्यांची माहितीच होत नाही. योजना कुठली आहेत्यासाठी निकष काय आहेतयोजनेचे स्वरूप काय आहेहे खऱ्या लाभार्थीला कळू दिले जात नाही. समन्वय अभावानेच ही स्थिती निर्माण झाली असून हाच समन्वय घडविण्यात नवनिर्वाचित आमदार सुरेशभाऊ गोरे यांचा हातखंडा असल्याचे त्यांनी जिल्हा परिषद सदस्य व उपाध्यक्ष म्हणून काम करताना दाखवून दिले आहे विरोधी विचारांच्या कार्यकर्त्यांना दडपशाहीने नव्हे तर विश्वासाने जिंकण्याचा प्रयत्न  गोरे करतील असा सर्वाना विश्वास आहे.

गुंडगिरीचा बिमोड :
खेड तालुक्यात गेल्या काही वर्षांत गुंडगिरीचे स्तोम माजले आहे. अनेक अवैध व्यवसाय सुरु आहेत. एमआयडीसीत माथाडीआणि अनेक ठेके मिळविणारे गुंड तयार झाले आहेत. काही कारखानदारांनी त्यांना आपल्या पदरी पोसले आहे. टोल नाक्यांवर स्थानिकांना धमकावण्याचे प्रकार घडत असतात. त्या सर्वाना तत्कालीन राष्ट्रवादीच्या आमदारांचे अभय होते असा नागरिकांचा समज होता. त्यामुळे त्यांच्याकडून कुरघोडी होण्याची शक्यता गृहीत धरून ही स्थिती कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देता बदलण्यासाठी आणि येथील कारखानदारांशी समन्वय ठेवून स्थानिकांच्या ठेकेदारी व कंत्राटी स्वरूपाचा नव्हे तर कायम स्वरूपी रोजगार व व्यवसाय मिळवून देण्यासाठी नवनिर्वाचित आमदारांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.
------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)