गर्भाशयाचा कॅन्सर चिंतेची बाब
महिलांमधील गर्भाशयाचा कॅन्सर चिंतेची बाब : डॉ. कोप्पीकर
आजार अंगावर न काढण्याचा सल्ला
चाकण येथील आरोग्य व्याख्यानमालेत मार्गदर्शन करताना कॅन्सरतज्ज्ञ डॉ. सी. बी. कोप्पीकर (छायाचित्र: अविनाश दुधवडे,चाकण) |
चाकण :
महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर होणे ही चिंतेची बाब असून महिलांनी कोणताही आजार अंगावर सहन करत राहिल्यानेच त्याचे स्वरूप गंभीर होते त्यामुळे या बाबत संकोच न करता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला गेला पाहिजे असा मोलाचा सल्ला कॅन्सरतज्ज्ञ डॉ. सी. बी. कोप्पीकर यांनी चाकण येथे दिला . चाकण हार्ट फाउंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य व्याख्यानमालेत 'स्तनाचा कॅन्सर : आधुनिक निदान व उपचार पद्धती' या विषयावर ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले गर्भाशयाच्या आतील आवरणामधील पेशींमध्ये बदल होतो. त्या पेशी फार भरभर वाढायला लागतात. तसेच त्यांच्या रचनेतही बदल होतो. हळूहळू त्या इतक्या संख्येने वाढतात की, गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये, गर्भाशयाच्या मुखाजवळ (सर्व्हिक्स) तसेच रक्तवाहिन्यांद्वारा शरीरात इतर ठिकाणी पसरत जातात अशा प्रकारच्या रोगाला गर्भाशयाचा कॅन्सर असे संबोधले जाते. या कॅन्सरच्या अगदी प्राथमिक अवस्थेत दुर्दैवाने फारशी बाह्य लक्षणे दिसून येत नाहीत. या आवरणाचा सूक्ष्मदर्शक यंत्राने तपास केला (हिस्टोपॅथॉलॉजिकल एक्झामिनेशन) तर कॅन्सरच्या पेशी आढळून येऊ शकतात. हा आजार होऊच नये यासाठी महिलांनी संकोच नकरता तातडीने तज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे, संकोच बाळगल्याने हा आजार बळावल्याची अनेक उदाहरणे आहेत. आश आजाराचे लवकर निदान झाल्यास शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी, केमोथेरपी, हार्मोनल थेरपी इत्यादी उपाययोजना कराव्या लागतात. यापैकी कोणत्या उपाययोजना कधी करायच्या हे तज्ज्ञ डॉक्टर ठरवतात. प्रत्येक पेशंटच्या निदानावर ते अवलंबून असते. यावेळी त्यांनी चाकण हार्ट फौंडेशनच्या कार्याचा गौरव केला . ते म्हणाले हृदयरोग्यांना मदत करण्यासाठी सातत्याने पुढे सरसावणार्या चाकण हार्ट फाउंडेशनचे काम कौतुकास्पद व समाजाला दिशा देणारे आहे. यावेळी खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व्याख्यानमालेचा प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील शहा, सचिव डॉ. रावसाहेब आवटी, मामा शिंदे, विजय पवार, ध्रुव कानपिळे, सुभाष भुजबळ, डॉ. विकास साबळे, भरत कानपिळे, रामदास जाधव , रमेश बोथरा आदी उपस्थित होते. आमदार दिलीप मोहिते म्हणाले, जगात आज तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. कोणताही आजार असला तरी त्यावर निदान करणे शक्य आहे. कीर्ती शहा यांनी सूत्रसंचालन तर सुनील शहा यांनी प्रास्ताविक केले. रामदास जाधव यांनी आभार मानले.
-------------
अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा