चाकण एसटी स्थानकाच्या आवारात पाण्याची डबकी

चाकण : अविनाश दुधवडे
सव्वा कोटी रुपयांहून अधिक खर्च करून चाकण येथील एसटी बसस्थानक सुसज्ज करण्यासाठीचे काम कासव गतीनेच सुरु असून अनेक दिवस रेंगाळलेले या स्थानकाचे काम
नक्की केंव्हा पूर्ण होणार असा प्रश्न प्रवासी विचारू लागले आहेत. पावसाळ्या पूर्वी या बस स्थानकाचे काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत होते .मात्र
अद्याप पर्यंत काम पूर्ण होऊ न शकल्याने व पावसामुळे या स्थानकाच्या आवारात पाणी साचत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या
स्थानकाचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी प्रवाशांसह नागरिकांकडून होत आहे .
'बांधा वापरा, हस्तांतरित करा' (बीओटी) या तत्त्वावर चाकण एसटी बस स्थानकाचे काम करण्यात येत आहे.चाकण एसटी बसस्थानकाची सुमारे पन्नास वर्षापूवीर्ची
इमारत मोडकळीस आली होती. या बसस्थानकात स्वच्छतागृह, प्रवाशांसाठी बसण्याची सोय, फलाट आदी काहीच सोयी,
सुविधा नव्हत्या. पावसाळ्यात बसस्थानकाच्या आवारात पाणी साचत होते . तसेच मलमूत्राचे डबके आवारात साचल्याने प्रवाशांना दुर्गंधी सहन करावी लागत होती .
त्यामुळे या आवारात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या बसस्थानकाचे अद्ययावत पद्धतीने काम व्हावे, अशी प्रवाशांची मागणी होती. तत्कालीन परिवहन मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील यांनी या बसस्थानकाचे काम ऑक्टोबर 2010 नंतर सुरू होईल व 'बीओटी' तत्त्वावर काम केले जाईल, असे जाहीर केले होते.
या स्थानकाचे एकूण पंचावन्न गुंठे क्षेत्र असल्याचे अधिकारी सांगतात . बसस्थानकात 450 चौरस मीटर बसस्थानक बांधण्यात आले आहे. तळमजल्यावर
बसस्थानक , तर पहिल्या मजल्यावर प्रवाशांसाठी लॉज करण्यात आले आहेत . नव्याने बांधण्यात आलेल्या या बसस्थानकात सहा फलाट असून, एका वेळी सहा बस थांबू शकणार आहेत.
प्रवाशांच्या सोयी साठी हे बांधकाम लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येवूनही दुमजली बांधकाम झाले असले तरी अद्याप पर्यंत बरीच कामे शिल्लक राहिली आहेत .
पावसामुळे या स्थानकाच्या आवारात पाण्याची डबकी साचत असून प्रवाशांना येथून ये-जा करणे अवघड होत आहे.एस टी बस स्थानकाच्या आवारातील रस्त्यांचे काम प्राधान्याने करावे
व या स्थानकाचे कामही तातडीने पूर्ण करावे अशी मागणी प्रवाशांसह नागरिकांकडून होत आहे .
---------------- Avinash dudhawade,chakan 9922457475

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा