वनसंपदेला आग अन काळ्या कुट्ट टेकड्या
वनसंपदेला आग अन काळ्या कुट्ट टेकड्या
वन हद्दीतील वणवे थांबविण्याची गरज
चाकण-आळंदी रस्त्यावरील चित्र
चाकण: अविनाश दुधवडे
चाकण- आळंदी रस्त्यावरील वनविभागाच्या हद्दीतील गवताला वणवा (आग) लावण्याचे प्रकार वाढले असून त्यामुळे होणारे प्रदूषण व निसर्गहानीकडे प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे. लगतच्या भागात लोकवस्ती वाढत असून नैसर्गिकरीत्या लागणाऱ्या आगीचे प्रमाण घटले आहे; मात्र जाणुनबुजून डोंगरावरील वाढलेल्या गवताला आग लावण्याचे प्रकार वाढले आहेत. या कृत्रिम वणव्यांमुळे होरपळलेली झाडे ,वन हद्दीतील जमीन व डोंगर काळेकुट्ट व भकास होत आहेत.
कधीकाळी चाकण आळंदी रस्त्यावरील वन विभागाचे जंगल म्हटले की दूरपर्यंत गर्द वनराईने झाकलेल्या उंच टेकड्या, त्यातील ऐतिहासिक पाण्याचे तळे ,निसर्गरम्य वातावरण असे काही वर्षांपूर्वीचे चित्र होते. या भागात औद्योगीकरण झाल्यानंतर गेल्या काही वर्षात हे चित्र आता बदलू लागले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे वन हद्दी लगतच्या भागात होत असलेले नागरीकरण व वेगाने झालेली जंगलतोड, सुकलेल्या गवताला लावले जाणारे वणवे हे असल्याचे दिसते. जाणीव पूर्वक होणाऱ्या दुर्लक्षामुळे बेसुमार वृक्षतोडीला चालना मिळत आहे.
त्यातच डोंगराळ भागातील गवताला वणवे लावण्याची विकृत मनोवृत्ती वाढत असल्याने हिरवेगार डोंगर काळेकुट्ट होत आहेत. या वणव्यात निसर्गाच्या जीवनचक्रातील साखळीतील महत्त्वाचे कीटक, पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त होतात. यात वनौषधीही नष्ट होत आहेत.वनविभागाच्या हद्दीतील डोंगरकपारीतील झाडांना सतत लागत असलेल्या वणव्यांमुळे डोंगर काळेकुट्ट व भकास होत असल्याचे सर्वश्रुत आहेच. चाकण-आळंदी रस्त्यावरील विविध प्रकारच्या झाडांचे व वृक्षांचे अज्ञातांनी लावलेल्या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन पर्यावरणाची व निसर्गसंपदेची हानी झाल्याचे प्रकार या पूर्वीही अनेकदा उघडकीस आले आहेत. लिंब, वड, पिंपळ आदी बहुउपयोगी झाडांची यात मोठी हानी होत आहे.या कडे वनविभागानेही सोईस्कर दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यातच आता यंदाचा कमी पाऊस आणि उन्हाचा चढता पारा यामुळे येथील झाडे अक्षरशः वाळून चालली आहेत, लिंब, वड, पिंपळ आदी बहुउपयोगी झाडांची यात मोठी हानी होत आहे.या झाडांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात वाढ झालेले गवत असून, ते सुद्धा या कडक उन्हाने वाळून गेले आहे. या गवताला काही लोक गंमत म्हणून, तसेच मुद्दामहून आग लावत असल्याने लागलेल्या आगीत बाजूची नवीन झाडे झुडपे, तसेच वृक्ष जळून खाक होत आहेत. काही झाडांना आगीच्या ज्वालांची धग लागल्याने झाडे करपून जात आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. सध्या जागतिक पातळीवर तापमान वाढ, प्रदूषण आदी मुद्दे गाजत असताना चाकण लगतच्या भागातील हे एकमेव मोठे जंगल वणव्यामुळे होरपळून चालले आहे. यासाठी हे वणवे थांबविणे गरजेचे आहे. यासाठी जागृती बरोबरच संबंधितांनी जबाबदारी घेणे गरजेचे झाले आहे अशी मागणी निसर्गप्रेमी संघटनांकडून होत आहे.
अराजक तत्व झाकण्यासाठी? :
अशा पद्धतीने वनविभागाच्या हद्दीत आगीच्या वणव्यात दरवर्षी शेकडो हेक्टरमधील जंगल भक्ष्यस्थानी पडते. राष्ट्रीय संपत्तीचा मोठ्या प्रमाणावर नाश होतो. जंगलात वावरणारे अराजक तत्त्व आणि संबंधितांची अवैध वृक्षतोड प्रकरणे उघड होऊ नये म्हणूनही आग लावली जाण्याचेही प्रकार घडतात. जंगलात लागणाऱ्या आगीत होरपळून मोठ्या प्राण्यांच्या मृत्यूच्या घटना फारशा घडत नसल्या तरी सरपटणारे प्राणी याला बळी पडतात. मात्र ही आग जमीन स्तरावरून वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने जंगलातील झाडांना कवटाळत असते. झाडावरील पक्षांची घरटी आगीच्या भक्ष्यस्थानी येतातच, अशी निसर्गप्रेमींची तक्रार आहे. नैसर्गिक आणि कृत्रीम असे सर्वच प्रकारचे वणवे टाळण्याचं आव्हान वनविभागासमोर आहे.
---------
फोटो : चाकण-आळंदी रस्त्यावरील वनविभागाच्या जंगलात रात्री-अपरात्री लावल्या जाणाऱ्या आगीत झाडे ,वनसंपदा भस्मसात होत असून वन जमीन जळून अशी काळी कुट्ट होत असल्याचे भीषण दृश्य पहावयास मिळत आहे .
---------------Avinash Dudhawade,chakan 9922457475

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा