भामा नदी वाहतेय दुथडी भरून
भामा नदी वाहतेय दुथडी भरून
भीमा नदीला पूर
चाकण: अविनाश दुधवडे
पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडील गावांमध्ये पावसाची संततधार सुरू असून मुसळधार पावसाने येथील खेड तालुक्यातील भामा नदी दुथडी भरून वाहत आहे .दिवस भरात अधून मधून जोरदार पाऊस होत असल्याने बंधारे व धरणांमध्ये पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे.अन्य नद्यांचे पाणी भीमेत मिसळत असल्याने भीमेला पूर आला आहे. पुणे जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा चांगलाच सुखावला आहे.
संततधार पावसामुळे रविवारी रात्री पाण्याचा दाब वाढल्याने व बंधाऱ्याच्या फळ्या बंद असल्याने बंधाऱ्या वरून वाहणाऱ्या वेगवान नदीच्या पाण्याने चाकणच्या पाणी पुरवठ्याच्या भामा नदीवरील बंधाऱ्याचा किनारा फोडला व लगतच्या शेताला चक्क शंभर - दीडशे फुटांचे खिंडार पाडले होते . त्या पार्श्वभूमीवर चाकण ग्रामपंचायतीने रोह्कल येथील बंधाऱ्याच्या बारा फळ्या काढल्या असून खुप मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने वाकी केटी बंधाऱ्याच्या फळ्या काढता आल्या नाहीत . रोहकल हद्दीतील एका बंधाऱ्याच्या 12 फळ्या काढल्याने अतिशय वेगाने पाणी भामा नदी पात्रातून वाहत असून पुढे भीमेच्या पत्रात पोहचत आहे .
---------------------
फोटो : खेड तालुक्यातील भामा नदी अशी दुथडी भरून वाहत आहे.
Avinash Dudhawade ,chakan 9922457475

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा