मुसळधार पावसांत सेवा रस्त्यांच्या होतात नद्या

मुसळधार पावसांत सेवा रस्त्यांच्या होतात नद्या 



पाण्याचा निचरा होण्यात अडचणी











चाकण: अविनाश दुधवडे 
 "नेमेचि येतो पावसाळा' या म्हणीप्रमाणे पाच मिनिटे जरी पाऊस झाला तरी चाकण शहरातील मुख्य रस्त्यां लगतच्या भागाला तलावाचे स्वरूप प्राप्त होत आहे . पाणी वाहून जाण्यास वाट नसल्याने काही भागात साठलेल्या पाण्याचा आठ-आठ दिवस पाण्याचा निचराच होत नसल्याची स्थिती निर्माण होत आहे. त्यातून पादचारी वाहनधारक आणि व्यापारी यांना अक्षरश कसरत करावी लागत आहे . आठ दिवसांच्या विश्रांती नंतर आज (दि.24) सायंकाळी पाच वाजनेचे सुमारास चाकण पंचक्रोशीत सुरु झालेल्या पावसाने नागरिकांना याचा पुन्हा प्रत्यय आला. चाकण आंबेठाण चौकालगत उड्डाण पुला खालील भागात सेवा रस्त्यांना अक्षरश नदीचे स्वरूप आले होते.  
 पावसाळ्यात दिवसेंदिवस तुंबणाऱ्या पाण्याचा जलद निचरा होण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. दरवर्षी पावसाळ्यात नियोजनाअभावी आंबेठाणचौक , तळेगाव चौक भागात पावसाचे अन्‌ नाल्यांतील घाण पाणी कुठे गुडघ्याएवढे, तर कुठे कमरेइतके रस्त्यावरच साचते. त्यामुळे चाकण शहरातील महत्वाच्या चौकाचौकांना तलावाचे स्वरूप येते. पावसाळ्यात नियोजनाअभावी साठणाऱ्या या पाण्यामुळे नागरिकांसह वाहनधारक, व्यावसायिक त्रस्त होत आहेत. आज (दि.24) पावसाने आंबेठाण चौकालगत उड्डाण पुला खालील भागात सेवा रस्त्यांवर तुंबलेल्या पाण्यात वाढ झाल्याने दोन वाहने अक्षरश या पाण्यात अडकून पडली आहेत, मात्र याची 'ना कुणाला चिंता ना कुणाला',  फिकीर अशी अवस्था निर्माण झाली आहे .
   पावसाळ्यामध्ये रस्त्यावर पाणी साचते. यामध्ये एकट्या ग्रामपंचायतीचा दोष नाही, तर यामध्ये काही प्रमाणात व्यापारीही दोषी आहेत. कारण बहुतांश व्यापारी आपल्या दुकानासमोरील भागात मोकळी जागा असावी म्हणून राडारोडा समोरच असलेल्या भागात ,नालीमध्ये टाकतात. काहीजण मनाप्रमाणे नाल्यांवर फारशा - सिमेंटचे आच्छादन टाकतात यामुळे नाली तुंबते. त्यातच या नाल्यांना उतारच नसल्याने सांडपाणी किंवा पावसाचे पाणी पुढे जाण्यास मार्ग नसतो. त्यामुळे रस्त्यावरच पाणी साचते. त्यामुळे संबंधित व्यावसायिक -व्यापाऱ्यांनी राडारोडा - कचरा नाल्यामध्ये टाकू नये अशीही मागणी होत आहे.

गटारी -ड्रेनेज करण्याची मागणी : 
पावसाळ्यात ठिकठिकाणी तुंबणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा होण्याच्या दृष्टीने "ड्रेनेज'ची व्यवस्था करावी, अशी मागणी चाकण मधील नागरिकांकडून होत आहे. शहरातील आंबेठाण चौक ,तळेगाव चौक अधिक लोकवस्तीच्या अनेक भागात अद्यापपर्यंत मोठ्या गटारींची, ड्रेनेजची कुठलीच व्यवस्था झालेली नाही. त्यामुळे रहिवाशांची खूपच गैरसोय होत असते. पावसाळ्यातील पाणी साचल्यामुळे दुर्गंधी देखील सुटते. ज्या भागात गटारी आहेत, त्यांचीही दुरवस्था झाली आहे.
------------------

 फोटो:  सोमवारी सायंकाळी सुरु झालेल्या पावसाने आधीच तुंबलेल्या पाण्यात वाढ होऊन सेवा रस्त्याला आंबेठाण चौकाजवळ असे नदीचे स्वरूप आले होते.   
 व इंजिन मध्ये पाणी गेल्याने बंद पडून पाण्यात अडकलेली दोन वाहने  
------------------------------------Avinash Dudhawade,chakan 9922457475

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)