शाळेच्या पहिल्या दिवशी चाकण गजबजले

शाळेच्या पहिल्या दिवशी चाकण गजबजले 
स्वागताने भारावले विद्यार्थी अन पालक 

चाकण: अविनाश दुधवडे 
नवा गणवेश... नवी पुस्तके ... नवे दफ्तर... यामुळे उल्हासित झालेली मुले आज (दि.17) पहिल्याच दिवशी रुबाबात शाळेत आल्याचे चित्र चाकण परिसरात पहावयास मिळाले . प्रवेशद्वारावर या विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, मुख्याध्यापकांनी  व शिक्षकांनी स्वागत केले. या स्वागताने विद्यार्थी व त्यांचे पालक भारावून गेले होते.

 चाकण परिसरात शाळा सुरु होणार म्हणून दोन-तीन दिवस अगोदरच विविध शाळांनी आपला परिसर स्वच्छ केला होता. अनेकांना शाळेच्या प्रांगणात रांगोळी काढण्यात आली होती. शाळेतील शिक्षक शाळा सुरु होण्याअगोदर शाळेत हजर होते. प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. विद्यार्थी येताच शिक्षक अन मुख्याध्यापक आदींनी तर कांही ठिकाणी शिक्षण विभागातील अधिकारी मंडळीनी प्रसन्न वातावरणात गुलाबपुष्प देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. नवो दोस्त, नवे शिक्षक, नवीन शाळा असल्यामुळे जी मुले पहिल्या वर्गात गेली त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आणि रडूही आले. शाळेत आपला बाळ रमेल किंवा नाही या साशंकतेने शाळेत सोडल्यापासून ते शाळा सुटेपर्यंत कांही पालकांनी आपला ठिय्या शाळा परिसरातच मांडल्याचे चित्र चाकण मधील शिवाजी विद्यालयात पहावयास मिळत होते. येथील जिल्हा परिषदेच्या प्रशालेत व  शिवाजी विद्यालयात चाकणचे सरपंच काळूराम गोरे ,प्राचार्य मार्तंड खोडदे , अरुण देशमुख, सुभाष गारगोटे,किशोर गोरे, मुरलीधर मांजरे,हे देखील बाळगोपाळांच्या स्वागतासाठी जातीने उपस्थित होते. या भागातील सर्व प्रशालांमधील नवागतांचे गुलाबपुष्प व पाठ्यपुस्तके देवून स्वागत करण्यात आले.
--------------------

फोटो :  चाकण परिसरातील प्रशालांमध्ये गुलाबपुष्प व पाठ्यपुस्तके देवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
Avinash Dudhawade,chakan 9922457475 








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)