केळगाव येथे शेतमजूर दाम्पत्याचा निर्घुण खून

केळगाव येथे शेतमजूर दाम्पत्याचा निर्घुण खून
चोरीच्या उद्देशाने खून केल्याचा प्राथमिक अंदाज


चाकण: अविनाश दुधवडे
ळंदी जवळ केळगाव (ता. खेड,जि.पुणे )  एका घरावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या दरोडेखोरांनी शेतमजूर दाम्पत्याचा तोंडावर शरीरावर धारदार हत्याराने वार करून व लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण करून निर्घुण खून केल्याची थरारक घटना आज  (दि.31) सकाळी उघडकीस आली असून या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
    राजेभाऊ शेषराव शिंदे (वय 70) व लक्ष्मीबाई राजेभाऊ शिंदे (वय 65, दोघे सध्या रा. केळगाव,ता.खेड,जि.पुणे ,मूळ रा.मानवली ता.मानवत जि.परभणी) असे  हत्या करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. या घटनेची फिर्याद गंगाधर दामोदर मुंगसे (रा.इंद्रायणीनगर ,भोसरी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात दिली आहे. आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आळंदी गावाचे हद्दीत केळगाव येथे गंगाधर मुंगसे यांचे शेत असून त्या शेतावर हे दाम्पत्य गेल्या तीन  वर्षांपासून मजुरीचे काम करीत होते.  याच शेतालगत असणाऱ्या खोलीत हे दाम्पत्य वास्तव्यास होते. गुरुवारी (दि.30) रात्री साडेदहा ते आज सकाळी दहा वाजनेचे दरम्यान हे दाम्पत्य केळगाव येथील शेतातील घरासमोर कॉट वर झोपलेले असताना त्यांचा तिक्ष हत्यारांनी सपासप वार करून खून करण्यात आला. आज (दि.31) सकाळी दहा वाजनेचे सुमारास शेतावर आलेल्या शेतमालक मुंगसे यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.  राजेभाऊ शिंदे यांच्या गळ्यावर चेहऱ्यावर खोलवर चीरल्याच्या खुणा आढळून आल्या तर लक्ष्मीबाई यांच्या डोक्यात लाकडी दांड्क्यांचे जबरदस्त प्रहार करण्यात आल्याचे पोलिसांनी व चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या दाम्पत्याच्या घरातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त स्थितीत  मिळून आल्या असून त्यावरून हा प्रकार चोरीच्या उद्देशाने करण्यात असल्याचा प्राथमिक अंदाज आळंदी पोलिसांनी व्यक्त केला आहे.  घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक विजय मगर ,उपविभागीय पोलीस अधिकारी भारत पाटील,चाकणचे पोलीस निरीक्षक सुशील कदम,आळंदी पोलीस ठाण्याचे अधिकारी बाप्पुराव देशमुख यांनी भेट देवून पहाणी केली.  घटनास्थळी श्वानपथकाला व ठसे तज्ज्ञांना तातडीने पाचारण करून परिसराची पाहणी करण्यात आली. श्वान पथक मात्र फार दूर पर्यंत मग काढू शकले नाही. घटनास्थळी पोलिसांना एक लोखंडी गज,लाकडी दांडके मिळून आले आहे. आळंदी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून या दाम्पत्याचे मृतदेह शवविच्छेदन व उत्तरीय तपासणी साठी चाकण ग्रामीण रुग्णालयात आज सायंकाळी पाच वाजनेचे सुमारास पाठविले आहेत.

दरोड्याचा बनाव ? :
मुंगसे यांच्या शेतात काम करणाऱ्या परभणी जिल्ह्यातील दाम्पत्याच्या या हत्येचे गूढ वाढले आहे. या दाम्पत्याला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहे. त्यांच्या नातीचे मागील महिन्यात परभणीला थाटामाटात लग्न झाले होते. स्वतःच्या मुलाशी फारसे पटत नसल्याने व गावात वितुष्ट असल्याने या दाम्पत्याने मानवली (जि.परभणी) येथील  शेती-वाडी  सोडून याभागात शेतमजुरीचे काम करणे पसंत केले होते, असे त्यांच्या याभागातील नातेवाईकांनी सांगितले.  थाटात झालेल्या लग्नामुळे परभणी भागातील चोऱ्या-दरोडे टाकणाऱ्या काही टोळ्यांनी (जमातींनी) हा प्रकार केला असावा किंवा गावाकडील वादातून दरोड्याचा प्रकार दर्शवून या दाम्पत्याची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांच्या अंतर्गत गोटातून  व्यक्त केला जात आहे. यास उपविभागीय पोलीस अधिकारी भारत पाटील यांनीही दुजोरा दिला असून अशा घातपाताचा संशय गृहीत धरून पोलिसांचे एक पथक परभणी येथे पाठविण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.
-------------------

----------------------------------Avinash Dudhawade,chakan, 9922457475

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)