पटसंख्या टिकविण्यासाठी शिक्षकांची धावाधाव

खाजगी प्रशालांमध्ये विपर्यस्त चित्र
चाकण: अविनाश दुधवडे
प्राथमिक-माध्यमिक शाळांचे वार्षिक निकाल जाहीर झाल्या पासूनच पटसंख्या टिकविण्यासाठी जिल्हापरिषद शिक्षकांची धावाधाव सुरू असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. जिल्हा परिषद शाळांचे पटसंख्या राखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, तर खासगी शाळांकडे प्रवेशासाठी रांगा लागत आहेत. चाकण सारख्या सुसाट लोकसंखेने विस्तारत्या भागात शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या खाजगी शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा यासाठी पालकांची शाळा सुरु होण्यापूर्वीच परीक्षा सुरु झाल्याचे विपर्यस्त चित्र पहावयास मिळत आहे.
गेल्या पाच-सात वर्षांपासून चाकण भागात खासगी शाळांची विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढली आहे. त्या शाळांमध्ये देण्यात येत असलेल्या सोयी-सुविधा, कपडे, वाहनाची व्यवस्था यामुळे शहरीसह ग्रामीण भागातील पालकांचा ओढा खासगी शाळांकडे वाढला आहे. खासगी शाळांचा निकालही चांगला लागत असल्याने त्या शाळांमध्ये आपल्या मुलाला प्रवेश मिळाला पाहिजे, यासाठी पालकांचे वर्षभरापासून प्रयत्न सुरू असतात. त्या शाळांत प्रवेशासाठी डोनेशन घेऊन पालकांच्या रांगा लागल्या आहेत. त्याउलट जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची स्थिती आहे. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारत आहे. त्या शाळांतील मुले शिष्यवृत्ती, एमटीएस आदी परीक्षांत चमकत आहेत; मात्र तेथे खासगी शाळांच्या दर्जाच्या सुविधा नाहीत असा समज रूढ झाल्यामुळे जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरत चालली आहे. शाळांतील पटसंख्या टिकविण्यासाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या घरोघरी जावे लागत असल्याचे चित्र आहे .
खाजगी संस्थाचालकांनी शिक्षकांवर पट टिकविण्याची सर्व जबाबदारी टाकलेली आहे. पटसंख्येबाबत बोगसगिरी केल्यास मान्यता रद्दची टांगती तलवार शाळांवर आहेच . शासनाने मागील वर्षी केलेल्या बोगस पटपटताळणी मोहिमेमुळे शिक्षक व संस्थाचालकांना धडकी अद्याप टिकून आहे. पुणे जिल्ह्यातील काही शाळा -संस्था अशा बोगस गिरीने कारवाईच्या दाढेत आल्याचे सर्वश्रुत आहेच.मुलांना आपल्याशाळेत येण्यासाठी एकीकडे मोठे डोनेशन तर दुसरीकडे मोफत वह्या-पुस्तके, शाळेचा पास, गणवेश यासह विविध आमिषे दाखवली जात असल्याची परिस्थिती आहे. खासगी शाळांत झालेली वाढ, पालकांचा इंग्रजी शाळांकडे वाढलेला कल, आणि काही प्रमाणात कुटुंबनियोजनामुळे घटती विद्यार्थी संख्या यामुळे जिल्हा परिषद शाळांतील तुकड्या धोक्यात आल्या आहेत. त्यामुळेच 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थी शाळाबाह्य़ राहू नयेत म्हणून पटनोंदणी पंधरवडा कृति कार्यक्रमही आखण्यात आले आहेत .
खाजगी शाळांसाठी अट्टहास :
चाकण मध्ये मात्र औद्योगीकरण आणि त्या पाठोपाठ आलेल्या लोकसंखेच्या सुसाट लोंढ्यांनी येथील शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या खाजगी प्रशालेतच प्रवेश मिळावा यासाठी पालकांना आत्ता पासूनच तयारी करावी लगत आहे. मान्यते पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याची लक्षमण रेषा या प्रशालेला आखून दिली असल्याने व प्रवेशाची मागणी करणाऱ्या विद्यार्थी-पालकांची संख्या प्रचंड असल्याने गेल्या दहा बारा वर्षांपासून येथे प्रवेशासाठी अनेकदा आंदोलनाचा पवित्रा विद्यार्थी संघटना आणि पालकांनी घेतल्याचे सर्वश्रुत आहेच. यंदा प्रवेश मागणाऱ्या विद्यार्थ्यांची सख्या आणखी वाढली असून अन्य शाळां मधून येथे शहराच्या मध्यवर्ती भागात आणि घरालगत असणाऱ्या असल्याने येणारांची सख्याही मोठी आहे. जनता शिक्षण संस्थेच्या येथील शिवाजी विद्यालयाने चक्क लकी ड्रो पद्धतीने प्ले ग्रुप मध्ये फक्त 50 प्रवेश देण्यात येणार असल्याचे आज (दि.10) स्पष्ट केले असल्याने व प्रवेश घेवू इच्छिणाऱ्यांची संख्या पाचशे पेक्षा अधिक असल्याने येथे पुन्हा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. अन्यत्र पटसंख्या टिकविण्यासाठी शिक्षकांची धावाधाव सुरू असताना येथे मात्र त्या पेक्षा अगदी वेगळे चित्र पहावयास मिळत आहे.
--------------------------------Avinash Dudhawade,chakan 9922457475

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा