चाकण मध्ये अंगणवाडी प्रवेशासाठी रांगा
चाकण मध्ये अंगणवाडी प्रवेशासाठी रांगा
चाकण: अविनाश दुधवडे
प्रवेशाच्या प्रश्नावरून प्रत्येक वर्षी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चाकण मधील जनता शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी विद्यालयाने मागील वर्षापासून प्ले ग्रुप (अंगणवाडी) मध्ये लकी ड्रॉ पद्धतीने प्रवेश देण्यात येत आहेत . मात्र शहराच्या मध्यवर्ती व घरापासून अगदी जवळ असणाऱ्या याच प्रशालेत परिसरातील सर्व मुलांना मिळावेत यासाठी गेल्या दोन दिवसांपासून पालकांनी प्रवेशअर्ज भरण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या आहेत.
चाकण सारख्या सुसाट लोकसंखेने विस्तारत्या भागात मात्र शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा यासाठी पालकांचा आग्रह कायम असून पटसंख्या टिकविण्यासाठी शिक्षकांची अन्यत्र धावाधाव सुरू असताना येथे मात्र विपर्यस्त चित्र प्रत्येकच वर्षी पहावयास मिळत आहे.
चाकण मध्ये औद्योगीकरण आणि त्या पाठोपाठ आलेल्या लोकसंखेच्या सुसाट लोंढ्यांनी येथील शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या मराठी माध्यमाच्या प्रशालेतच प्रवेश मिळावा यासाठी नागरिकांना आटापिटा करावा लागत आहे. मान्यते पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याची लक्षमण रेषा या प्रशालेला आखून दिली असल्याने व प्रवेशाची मागणी करणाऱ्या विद्यार्थी-पालकांची संख्या प्रचंड असल्याने गेल्या दहा बारा वर्षांपासून येथे प्रवेशासाठी अनेकदा आंदोलनाचा पवित्रा विद्यार्थी संघटना आणि पालकांनी घेतल्याचे सर्वश्रुत आहेच. यंदा प्रवेश मागणाऱ्या विद्यार्थ्यांची सख्या आणखी वाढली असून अन्य शाळां मधून येथे शहराच्या मध्यवर्ती भागात आणि घरालगत असणाऱ्या असल्याने येणारांची सख्याही मोठी आहे.प्रवेशाच्या मुद्द्यावर वाद होऊ नयेत यासाठी प्रशालेने प्ले ग्रुप (अंगणवाडी) मध्ये
लकी ड्रॉ पद्धतीने पुढील आठवड्यात पन्नास प्रवेश देण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापिका कोळी यांनी सांगितले.
--------------------------------
फोटो : अंगणवाडीच्या प्रवेशासाठी पालकांनी अशा लांबच लांब रांगा लावल्याचे दृश्य पहावयास मिळत होते .
Avinash Dudhawade chakan 9922457475

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा