सामुदायिक विवाह सोहळा ही चळवळ व्हावी : वळसे पाटील

सामुदायिक विवाह सोहळा ही चळवळ व्हावी : वळसे पाटील

चाकणला चाळीस जोडपी विवाहबद्ध
सुरेश गोरे मित्र मंडळाचा विवाह सोहळा

चाकण:अविनाश दुधवडे
सध्या विवाह समारंभात अनेक अनिष्ठ प्रथा आल्या आहेत. राज्यात दुष्काळी स्थिती असताना वारेमाप केला जाणारा खर्च आणि अनिष्ठ प्रथामुळे अन्न, वेळ आणि इतर काही गोष्टींची नासाडी होते. हे जर थांबवायचे असेल तर वारेमाप खर्चाला फाटा देत सामुदायिक विवाहाची चळवळ समाजात रुजलीच पाहिजे. सामुदायिक विवाह ही काळाची गरज असून अशा सोहळ्यात सहभागी होण्याची इच्छा समाजातील अधिकाधिक वधुवरांनी दर्शविल्यास मोठी क्रांती घडेल, असे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी चाकण येथे केले.
  सुरेशभाऊ गोरे मित्र मंडळ , मानव विकास कल्याण ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळी चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने चाकण येथे मार्केट यार्डच्या भव्य प्रांगणात आज (दि.30) मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी  दिलीप वळसे-पाटील बोलत होते. या प्रसंगी भोसरीचे आमदार विलास लांडे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दतात्रेय भरणे, माजी सभापती शरद बुट्टे, पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे खजिनदार प्रतापराव खांडेभराड,तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष विजय डोळस ,पंचायत समितीचे माजी उपसभापती राजूशेठ जवळेकर , संभाजी खराबी, नानासाहेब टाकळकर, विजयसिंह शिंदे, हिरामण सातकर ,माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल राक्षे, पी.टी. शिंदे, बाजीराव जाधव, शिवसेनेच्या विजया शिंदे, चाकणचे सरपंच काळूराम गोरे, माजी सरपंच नंदकुमार गोरे, माजी उपसरपंच अशोक बिरदवडे, साजिद सिकीलकर, चाकण पतसंस्थेचे सुरेश कांडगे, अशोक जाधव, आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी , विविध गावचे सरपंच, खेड तालुक्यातील व चाकण परिसरातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
 सायंकाळी सात वाजता हा विवाह सोहळा चाकण येथील मार्केट यार्डाच्या भव्य प्रांगणात पार पडला.  विवाह सोहळ्यात खेड तालुक्यातील चाळीस जोडपी विवाहबद्ध झाली. प्रास्ताविक करताना या सोहळ्याचे आयोजक सुरेश गोरे यांनी सामुदायिक विवाह आयोजित करण्यामागील भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की,  या सामुदायिक विवाह सोहळ्याचे यंदाचे एकविसावे वर्ष असून यंदाच्या दुष्काळी स्थितीत सामाजिक एकोपा ठेवण्यासाठी व अवाजवी खर्चाला फाटा  आणि कर्जबाजारी होण्याचे टाळण्यासाठी या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  अधिकाधिक जणांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले होते, त्यामुळेच यंदा या सोहळ्यात तब्बल 40 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत.
     सायंकाळी घोड्यावरून वधू-वरांची चाकण शहरातून  मिरवणूक काढण्यात आली होती. तालुक्यातील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला.
------------------

 फोटो ::::चाकण येथील सामुदायिक सोहळ्यात चाळीस जोडपी विवाह बंधनात अडकली---------------------------------------------------------------Avinash Dudhawade,chakan 9922457475 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)