चाकणच्या सरपंचांविरुद्ध अविश्‍वास ठराव मंजूर

चाकणच्या सरपंचांविरुद्ध अविश्‍वास ठराव मंजूर 
ठरावाच्या बाजूने पंधरा तर विरोधात दोन मते

चाकण: अविनाश दुधवडे
चाकणच्या सरपंचांविरुद्ध अविश्‍वास ठराव मंजूर 
ठरावाच्या बाजूने पंधरा तर विरोधात दोन मते  

चाकण:वार्ताहर 
 चाकण (ता. खेड ) येथील ग्रामपंचायतीचे  सरपंच काळूराम गोरे यांच्यावरील अविश्वास ठराव पंधरा विरुद्ध दोन अशा बहुमताने मंजूर करण्यात आला. येथील ग्रामपंचायतीत एकूण सतरा सदस्यसंख्या असून, ठरावाच्या बाजूने तब्बल पंधरा सदस्यांनी मतदान केले. 
 मनमानी कारभार करणे, विश्वासात न घेणे,  तसेच बेकायदा नोंदी घालणे आदी कारणे अविश्वास ठरावात नमूद करण्यात आली होती . तहसीलदार नारायण शेळकंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.24) चाकण ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेत हात उंच करून खुल्या पद्धतीने हा ठराव मंजूर करण्यात आला. सरपंच काळूराम गोरे ,उपसरपंच प्रीतम परदेशी,  माजी उपसरपंच अशोक बिरदवडे, साजिद सिकीलकर ,सदस्य दतात्रेय बिरदवडे, सुधीर वाघ,  दतात्रेय जाधव, कृष्णा सोनावणे, बानो काझी,  पूनम शेवकरी, अनुराधा जाधव,चित्रा कदम ,ज्योती फुलवरे, रेश्मा लेंडघर,पांडुरंग गोरे, संतोष साळुंके, आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. तर उशिरा आलेले सदस्य घोगरे यांचे मत अविश्वास ठरावाच्या विरुद्ध मानण्यात आले. सरपंचांवरील अविश्वास ठरावाच्या प्रती जिल्हाधिकारी कार्यालय खेड पंचायत समिती यांना पाठविण्यात येणार असून पुढील चाळीस दिवसांमध्ये नवीन सरपंच पदाची निवडणूक घेण्यात येणार असल्याचे तहसीलदार नारायण शेळकंदे यांनी सांगितले.  
 याबाबत उपसरपंच प्रीतम परदेशी, दतात्रेय बिरदवडे, यांनी सांगितले, की सरपंच गोरे हे अन्य सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पणे ग्रामपंचायतीचा कारभार करीत होते. त्यामुळे सतरा पैकी नऊ सदस्यांनी गोरे यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव दाखल केला होता. व पंधरा सदस्यांनी या ठरावाच्या बाजूने कौल दिला. सरपंच काळूराम गोरे यांनी सांगितले की, मी पूर्वी दिलेल्या राजीनाम्यावरील आक्षेप मागे घेत व पुन्हा राजीनामा देवूनही अविश्वास दाखल करून आणि ठरावावर चर्चा करण्याची बैठक घेण्याची काहीही गरज नव्हती. 

अन सरपंचांचे डोळे पाणावले:
 चाकण ग्रामपंचायतीच्या सभागृहात  तहसीलदार नारायण शेळकंदे यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झालेल्या आजच्या विशेष बैठकीत सकाळी अकरा वाजता अविश्वास ठरावाच्या बाजूने पंधरा सदस्यांनी हात वर करताच सरपंच गोरे यांनी  सभागृहातून काढता पाय घेतला, भावनिक होऊन सभागृहातून बाहेर पडताना  ते डोळ्यातील अश्रू मात्र अडवू शकले नाहीत.चाकण शहरात लोकांचा रोष पत्करून अनधिकृत बांधकामांवर हातोडा उचलण्यापासून, एमआयडीसीचे पाणी शहराच्या काही भागात आणण्यापर्यंत अनेक धडाडीने निर्णय घेणाऱ्या काळूराम गोरे यांची सरपंचपदाची कारकीर्द राजकीय मित्र ओळखण्यात अपयशी ठरल्याने अतिशय दुर्दैवी पद्धतीने संपुष्टात आली. चाकण ग्रामपंचायतीच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच असा अविश्वास ठराव दाखल व संमत करण्यात आला आहे . 
-------------------Avinash Dudhawade,chakan 9922457475 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)